Zee Marathi Savlyachi Janu Savali Promo : ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत राजकुमारच्या अफेअरचं सत्य मेहेंदळे कुटुंबीयांसमोर उघड झाल्याचं पाहायला मिळत आहे. सावली राजकुमारला एका वेगळ्याच मुलीबरोबर फिरताना पाहते. यानंतर मेहेंदळे कुटुंबीयांसमोर राजकुमारचा खरा चेहरा उघड करण्याचा प्रयत्न सावली करत असते पण, ऐश्वर्या तिला सगळ्यांसमोर खोट्यात पाडते. यामुळे सावली देवाच्या मदतीने एक मास्टरप्लॅन बनवते.

राजकुमार त्या मुलीला रेस्टॉरंटमध्ये जाऊन भेटतो आणि तिला महागडा नेकलेस सुद्धा भेट म्हणून देतो. हा व्हिडीओ सावली गुपचूप तिच्या फोनमध्ये रेकॉर्ड करते. यानंतर देवा त्या मुलीला मेहेंदळेंच्या घरी घेऊन जातो आणि सर्वांसमोर रेस्टॉरंटमधील व्हिडीओ दाखवतो. आपल्या नवऱ्याचा खरा चेहरा समोर आल्यावर अमृताला धक्का बसतो. तर, तिलोत्तमा राजकुमारला सगळ्यांसमोर घडलेल्या प्रकाराबद्दल जाब विचारते. यानंतर केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून राजकुमारला घराबाहेर काढलं जातं.

आता लवकरच मेहेंदळेंच्या घरी मंगळागौरीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवाला राजकुमार उपस्थित नसतो…त्यामुळे अमृताला जमेल तसे टोमणे मारायचे असा प्लॅन ताराचा असतो. सावली आणि अमृता दोघीजणी किचनमध्ये सगळी आवराआवर करत असतात. इतक्यात त्याठिकाणी तारा पोहोचते आणि अमृताला बरंच काही सुनावते.

सावली ताराला कानाखाली वाजवते

तारा अमृताला म्हणते, “आज मंगळागौरीचा सण आहे वहिनी… हा सण कशासाठी साजरा करतात? नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हो ना…कुठे आहे तुमचा नवरा? तो फक्त तुमच्यामुळे घराबाहेर आहे. तुम्ही त्यांना एक मूल देऊ शकला नाहीत…सांगा ना. यांच्यासारख्या काहीच किंमत नसलेल्या बाईबरोबर का राहतील ते?”

ताराचं हे वाक्य ऐकताच सावलीचा संयम सुटतो. ती ताराला सणसणीत कानाखाली वाजवते. ताराने थेट अमृताच्या मातृत्त्वावर प्रश्न उपस्थित केलेलं असतं हे सावलीला अजिबात पटत नाही. म्हणूनच नेहमी साधीभोळी वाटणारी सावली मालिकेत रौद्ररुप धारण करून ताराला चांगलीच अद्दल घडवणार आहे. सावली तिला सांगते, “बास झालं आता, तुझी पात्रता तरी आहे का त्यांच्याशी बोलायची? पुन्हा माझ्या वहिनींशी असं बोललीस तर गाठ माझ्याशी आहे.”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सावली तिला दुसऱ्या गालावर सुद्धा वाजव”, “अरे वाह जबरदस्त प्रोमो”, “खूप छान काम केलंय सावलीने” अशा कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत. दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’चा हा विशेष भाग ३ ऑगस्टला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता प्रसारित केला जाणार आहे.