मराठी अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय मुदद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत बेधडकपणे मांडताना दिसतात. त्यांची वक्तव्यं अनेकदा चर्चेत असतात पण याबरोबरच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टही बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शरद पोंक्षे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नुकतीच एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडीओत ते बाजीराव पेशवे यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. ते या भाषणातून बाजीराव पेशवे किती थोर होते हे प्रेक्षकांना सांगत आहेत.

आणखी वाचा : ‘कट्यार काळजात घुसली’ला ७ वर्ष पूर्ण होताच सुबोध भावेची मोठी घोषणा, पुन्हा प्रेक्षकांना देणार सांगीतिक मेजवानी

शरद पोंक्षे म्हणतात, “आपल्याला बाजीराव माहितेय तो फक्त मस्तानीवर प्रेम करणारा बाजीराव माहितेय, याच्या एवढं दुर्दैव नाही. वयाच्या एकविसाव्या वर्षी पेशवे पद मिळालं आणि बेचाळीसाव्या वर्षी मृत्यू आला. २१ वर्षात ४२ लढाया आणि एकही लढाई न हरलेला जगातील एकमेव अपराजीत योद्धा म्हणजेच बाजीराव पेशवे.”

हेही वाचा : ‘तुम्ही काय गुंड आहात का? हा हलकटपणा…’, प्रेक्षकांना मारहाण करत चित्रपटगृहाबाहेर काढलं जात असल्याने शरद पोंक्षे संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये, इतक्या लढाया लढला एकही हरला नाही, पण कधीही स्वत:ला छत्रपती म्हणवून घेतलं नाही. एवढी प्रचंड ताकद, एवढी अफाट बूद्धिमत्ता, अफाट राजनिती, अफाट मूत्सद्देगिरी होती. त्यांनी मनात आणलं असतं तर ते छत्रपतींची गादी बळकावू शकले असते, पण त्यांनी असं केलं नाही. अख्खी १०६ वर्षांची पेशवाई ही फक्त छत्रपतींच्या गादीचा सेवक म्हणून निभावली आहे.” शरद पोंक्षे यांच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करत अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.