भारतीय रिझर्व्ह बँकने वितरणातून २ हजार रुपयांची नोट बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत सोशल मीडियावर मीम्सही व्हायरल होत आहेत. ‘शार्क टँक इंडिया’ फेम अनुपम मित्तलनेही आरबीआयच्या २ हजार रुपयांच्या नोटबंदी निर्णयावर ट्वीट केलं आहे.

अनुपम मित्तलने ट्वीटमधून मोदी सरकारवर टीका केली आहे. त्याच्या या ट्वीटवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. “मी २ हजाराच्या नोटा कुठे ठेवल्या आहेत, याचा विचार करतोय” अशी कमेंट चाहत्याने केली होती. त्याच्या या कमेंटवर अनुपम मित्तलने भन्नाट रिप्लाय दिला आहे. “मी तुला शोधायला मदत करू शकतो,” असा रिप्लाय अनुपमने दिला आहे.

Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
anupam-mittal

हेही वाचा>> २ हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर ‘शार्क टँक इंडिया’ फेम अनुपम मित्तलचं ट्वीट, मोदी सरकारवर टीका करत म्हणाला…

अनुपम मित्तल ट्वीटमध्ये काय म्हणाला?

आरबीआयने २ हजाराच्या नोटा वितरणातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनुपम मित्तलने ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. “दुसरं मोठं निवडणूक वर्ष जवळ येत आहे, दुसऱ्यांदा नोटबंदीचा निर्णय. हा पॅटर्न आहे की योगायोग?” असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “नोट छापने की मशीन” गाण्यावर किली पॉलचा डान्स, नेटकरी म्हणाले, “२ हजार रुपयांच्या नोटा…”

आरबीआयकडून २ हजार रुपयांच्या नोटासंबंधी बँकांना पत्रकाच्या माध्यमातून सूचना दिल्या आहेत. नागरिकांना त्यांच्याजवळ असलेल्या २ हजाराच्या नोटा बँकेत जाऊन बदलून घेता येणार आहेत. २३ मेपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या नोटा बदलता येणार आहेत.