‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे अभिनेता शशांक केतकर घराघरांत लोकप्रिय झाला. नाटक, चित्रपट, मालिका, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतीच शशांकने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी आहे. अभिनेत्याच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालेलं आहे. शशांकने नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

शशांक केतकरची पोस्ट

नवीन technology नी मला कायमच भुरळ घातली आहे. Electric vehicle असा काही प्रकार असतो हे ज्या वयापासून मला कळू लागलं आहे तेव्हा पासून, आपण एकदा एक EV घ्यायची हे स्वप्नं होतं. मागच्या १४ वर्षात माझ्या ३ गाड्या झाल्या. पहिली marutisuzukiofficial Ertiga दुसरी kiaind Seltos आणि आता tata.evofficial Nexon.ev ! मागच्या वर्षी जेव्हा मी olaelectric घेतली, तेव्हाच ठरवलं होतं की योग्य वेळं आली की, petrol car वरून मी EV car वर सुद्धा shift होईन! आणि वर्षभरातच EV car दारात आली देखील.

हेही वाचा : “एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘त्या’ घटनेमुळे अंकिता लोखंडेवर संतापली! मनारा चोप्राबद्दल म्हणाली…

पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून अभिनेत्याने इलेक्ट्रिक कार खरेदी केल्याने सध्या शशांकचं नेटकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. त्याने पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. सध्या बाजारात या गाडीची किंमत Financial Express ने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास १४.७४ लाख ते १९.९४ लाख (एक्सशोरुम) एवढी आहे.

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’च्या यशानंतर उपेंद्र लिमये पुन्हा गाजवणार बॉलीवूड! ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका, जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शशांक केतकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत तो प्रमुख भूमिका साकारत आहे. याशिवाय अभिनेता नुकताच ‘तेलगी स्कॅम २००३’ या वेबसीरिजमध्ये झळकला होता.