‘लाखात एक आमचा दादा'(Lakaht Ek Aamcha Dada) मालिका सध्या नवीन वळण घेत आहे. तुळजा सूर्याच्या प्रेमात पडली आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या भावना, त्याच्यावर असलेल्या प्रेमाची सूर्याला कबुली दिली आहे. एका अर्थाने सूर्याचे लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता मात्र त्यांच्या घरात सूर्याच्या बहिणीच्या म्हणजेच तुळजाच्या लग्नाची घाई पाहायला मिळत आहे. सूर्याच्या कुटुंबासाठी ही आनंदाची बाब आहे. मात्र, तो आनंद फार काळ टिकणार नाही असा प्लॅन डॅडींनी केला आहे. आता शत्रूच्या एका कृतीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

शत्रूने नेमके काय केले?

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, सूर्याच्या घरी एक पूजा आहे. त्या पूजेला तेजू बसलेली आहे. यावेळी तिचा होणारा नवरा पिंट्या ऊर्फ समीर निकम आणि शत्रूसुद्धा हजर आहेत. पूजा करताना गुरुजी सांगतात, मुलीच्या आई-वडिलांनी पुढे या. त्यावर भाग्यश्री म्हणते, “आई नाहीये, पण आईची माया लावणारी वहिनी आहे, चालेल?” राजश्री म्हणते, “दादा आणि वहिनी आमच्यासाठी आई-वडिलांसारखेच आहेत.” गुरुजी म्हणतात, “चांगलंय, तुम्ही दोघांनी नैवेद्य दाखवून घ्या.” सूर्या तुळजा नैवेद्य दाखवताना दिसतात. त्यानंतर गुरुजी म्हणतात, “आता नवऱ्या मुलाच्या हातानं गाईला नैवेद्य भरवायचा आहे.” शत्रू म्हणतो, “द्या, मी लगेच भरवतो.” त्याच्या बोलण्यानंतर सगळे त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत आहेत. शत्रू मनातल्या मनात म्हणतो, “नैवेद्य मीच दाखवणार, तेजूच्या नावापुढं माझंच नाव लागणार.”

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना, “तेजूच्या पुढे कुणाचं नाव लागणार…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तुळजा आणि सूर्याचे लग्न झाल्यापासून डॅडी त्यांच्याशी बोलत नव्हते. मात्र, काही दिवसांपासून ते त्यांच्याशी चांगले वागत आहेत. सूर्याचे कुटुंब त्यामुळे आनंदित आहे. मात्र, डॅडींचा प्लॅन वेगळाच आहे. ते त्यांना फसवत आहेत. सूर्याला त्यांनी तेजूसाठी स्थळ आणल्याचे सांगितले. खरेतर तेजूचे लग्न शत्रूबरोबर लावून देण्यासाठी त्यांनी पिंट्याला आणले आहे. मात्र, सूर्याला वाटते की डॅडींनी स्थळ आणले आहे, म्हणजे ते उत्तमच असणार. त्यामुळे तो लग्नाच्या तयारीला लागला आहे. याबरोबरच, लग्नात काहाही कमी पडणार नाही, याची जबाबदारी त्याने घेतली आहे. आता डॅडींचा हा प्लॅन तुळजाच्या लक्षात येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: “अनुष्का मॅडम…”, वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर पारू पडली काळजीत; नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तेजूचे लग्न नक्की कोणाबरोबर होणार, डॅडींचा हा प्लॅन सर्वांसमोर येणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.