Shiva Fame Actor Shalva Kinjawadekar : छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार गेल्या महिन्याभरात लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. रेश्मा शिंदे, किरण गायकवाड यांच्या पाठोपाठ शाल्व किंजवडेकरचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि सध्या ‘झी मराठी’वर सुरू असणाऱ्या ‘शिवा’ मालिकेतून अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरांत पोहोचला. छोट्या पडद्यावर त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. वैयक्तिक आयुष्यात नुकतीच शाल्वने लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

शाल्व आणि श्रेया डफळापुरकर यांचा विवाहसोहळा १४ डिसेंबर २०२४ रोजी पार पडला. या दोघांच्या लग्नाला सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर यांसह कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते. शाल्व-श्रेयाच्या लग्नातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याने लग्नानंतर पार पडलेल्या गृहप्रवेशाची झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

हेही वाचा : ऐश्वर्या राय नव्हे तर ‘ती’ होती विवेक ओबेरॉयचं पहिलं प्रेम, १७ व्या वर्षी झालं निधन; आठवण सांगत म्हणाला, “तिच्या मृत्यूने…”

शाल्व आणि श्रेयाचा गृहप्रवेश मोठ्या थाटात करण्यात आला. यासाठी अभिनेत्याच्या संपूर्ण घराला रोषणाई करण्यात आली होती. तसेच शाल्व-श्रेया घरात एन्ट्री घेताना सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी या जोडप्याने उखाणे सुद्धा घेतले. यावेळी अभिनेत्रीने सुंदर अशी साडी नेसली होती. तर, शाल्वने गडद निळ्या रंगाची शेरवानी घातली होती.

श्रेया उखाणा घेत म्हणाली, “मंगळसूत्राच्या दोन वाट्या सौभाग्याची खूण, शाल्वचं नाव घेते किंजवडेकरांची सून” तर, शाल्वने, “लग्न झालंय मस्त आता ओलांडणार आहेस तू माप, आता बायको म्हणून तू मला हवं तेवढं काप” असा झकास उखाणा बायकोसाठी घेतल्याचं पाहायला मिळालं. या दोघांच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : कोकणी पाहुणचार, आहेरात साडी अन्…; बॉलीवूड अभिनेत्री सहकाऱ्याच्या लग्नासाठी पोहोचली रत्नागिरीत! सर्वत्र होतंय कौतुक

हेही वाचा : Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी

श्रेया डफळापुरकर काय काम करते?

शाल्वची होणारी पत्नी श्रेया ही कॉस्ट्युम डिझायनर व स्टायलिश म्हणून ओळखली जाते. ‘Styling By Shreya’ असं तिच्या ब्रँडचं नाव आहे. अनेक सेलिब्रिटींसाठी तिने डिझायनर म्हणून काम सांभाळलं आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच कलाकारांची श्रेया खास मैत्रीण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून शाल्व आणि श्रेया हे दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचा साखरपुडा २०२३ मध्ये पार पडला होता. यानंतर यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला या दोघांच्या केळवणाची सुरुवात झाली होती. आता हे दोघंही विवाहबंधनात अडकले आहेत.