Priya Marathe Passed Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे. हिंदीसह मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या प्रियाची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. अवघ्या ३८ व्या वर्षी प्रिया मराठेची प्राणज्योत मालवली. तिच्या निधनाच्या बातमीने मराठी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठेच्या निधनाने मराठी कलाकारांनाही धक्का बसला आहे. तेजश्री प्रधान, अदिती सारंगधर, पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदेसह अनेक कलाकारांनी पोस्ट करून प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रिया मराठेच्या निधनाची बातमी आल्यानंतर तेजश्री प्रधानने पोस्ट केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये प्रियाच्या निधनाबद्दल Not Done असं लिहिलं आहे.

अदिती सारंगधरने पोस्टमध्ये प्रिया असं लिहून श्रद्धांजली वाहिली आहे.

उत्कर्ष शिंदेची पोस्ट
आयुष्य अकल्पित असल्याचं म्हणत उत्कर्ष शिंदेने प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे.

पुष्कर जोगची पोस्ट

