अभिनेत्री श्रेया बुगडेने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनय व विनोदाची उत्तम जाण असणाऱ्या श्रेयाने कॉमेडी क्वीन अशी वेगळी ओळख निर्माण केली. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेली श्रेया ‘चला हवा येऊ द्या’मधून घराघरात पोहोचली.

श्रेया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच श्रेयाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये जादूगर श्रेयाला एका छोट्याशा बॉक्समध्ये बसण्यास सांगत आहे. त्यानंतर त्या बॉक्समध्ये जादूगर एक धारदार ब्लेड आणि काही वस्तू टाकताना दिसत आहे. शेवटी या बॉक्समधून श्रेया गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा>> Video : चिमुकल्याचा डान्स पाहून अंकुश चौधरी भावुक, डोळे पाणावले अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘चला हवा येऊ द्या’मधील हा व्हिडीओ श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला श्रेयाने “माझ्या नवऱ्याला ही जादू खूपच आवडलीये,” असं कॅप्शन देत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. श्रेयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर तिच्या चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा>> Video : पूजा हेगडेच्या रिव्हिलींग ड्रेसची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, ट्रोल करत म्हणाले “इफ्तार पार्टीत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. याच कार्यक्रमातून श्रेयाला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. सध्या श्रेया या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे.