स्टार प्रवाहवरील प्रत्येक मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘शुभविवाह’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यामध्ये अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि अभिनेता यशोमन आपटे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या मालिका रंजक वळणावर असताना यशोमनने शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

यशोमन सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. ‘फुलपाखरु’ या मालिकेमुळे घराघरांत त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्याने या मालिकेत अभिनेत्री ऋता दुर्गुळेबरोबर मानस हे पात्र साकारलं होतं. छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत यशोमनने त्याच्या चाहत्यांना प्रकृतीसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : अर्जुन-रविराजमध्ये दिलजमाई! सुभेदारांच्या घरी पोहोचले किल्लेदार, मालिका रंजक वळणावर…

यशोमनने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या पायाला दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्याच्या संपूर्ण पायाला बँडेज गुंडाळल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. यावर “लिगामेंट टियर” असा हॅशटॅग जोडत यशोमनने “वय काही असो…पाय कधीही घसरू शकतो” असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. आता त्याच्या पायाला ही दुखापत नेमकी कशामुळे याबाबत त्याने काहीही माहिती दिलेली नाही. परंतु, कॅप्शन वाचून अभिनेत्याचा पाय घसल्यामुळे लिगामेंट टियर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : Video : “गावची पालखी…”, कोकणात आहे रवी जाधव यांचं सुंदर घर, शेअर केला शिमगोत्सवाचा खास व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
yashoman
यशोमन आपटे इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, यशोमनच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘शुभविवाह’ या मालिकेत सध्या तो आकाश हे पात्र साकारत आहे. त्याच्याबरोबर अभिनेत्री कुंजिका काळविंट, मधुरा देशपांडे, विशाखा सुभेदार असे दमदार कलाकार प्रमुख भूमिकेत आहे.