scorecardresearch

Video: दीपिकाच्या ‘बेशरम रंग’ला श्वेता तिवारीने दिला हटके ट्वीस्ट, बाथरोब घालून बाथरुममध्ये गेली अन्…

दीपिका पदुकोणच्या ‘बेशरम रंग’ला श्वेता तिवारीचा हटके ट्वीस्ट, व्हिडीओ व्हायरल

Video: दीपिकाच्या ‘बेशरम रंग’ला श्वेता तिवारीने दिला हटके ट्वीस्ट, बाथरोब घालून बाथरुममध्ये गेली अन्…
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

टीव्ही जगतातली प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. दोन मुलांची आई असलेली ४२ वर्षीय श्वेता तिवारी फिटनेसच्या बाबतीत तर अनेक नव्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. तिची स्टाइल, तिचा हटके अंदाज आणि फिटनेस सर्वांनाच चकीत करणारा आहे. आता ती सोशल मीडियावर चर्चेत आहे ते तिच्या हटके डान्समुळे. मागच्या काही दिवसांपासून ‘पठाण’ चित्रपटाचं ‘बेशरम रंग’ हे गाणं खूपच चर्चेत आहे आणि याच गाण्यावर श्वेताने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती बाथरोब घालून ‘बेशरम रंग’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. एकीकडे अनेक अभिनेत्रींनी या गाण्यावर दीपिकासारखाच डान्स व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तर दुसरीकडे श्वेताने मात्र या डान्सला हटके ट्वीस्ट दिला आहे.

आणखी वाचा- “आयुष्यात केलेल्या चुकांचे परिणाम…” वैवाहिक आयुष्याबद्दल श्वेता तिवारीनं व्यक्त केली खंत

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये श्वेता तिवारी बाथरोब घालून ‘बेशरम रंग’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. डान्स करता करता ती बाथरुममध्ये जाते आणि नंतर पिवळ्या रंगाचा स्टायलिश पँट-सूट घालून बाथरुममधून बाहेर पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना श्वेताने लिहिलं, “जेव्हा तो मला हजार वेळा विचारतो की तयार व्हायला किती वेळ लागणार आहे. तेव्हा मी काहीशी अशी तयार होऊन बाहेर पडते.” या व्हिडीओमध्ये श्वेताचा हटके आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा- “मला संपूर्ण घर पुन्हा डिझाइन करावे लागले होते कारण…” श्वेता तिवारीने सांगितला किस्सा

दरम्यान श्वेता तिवारीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती ‘अपराजिता’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. श्वेताची ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. तर दुसरीकडे श्वेताची मुलगी पलकही सलमान खानला त्याच्या आगामी चित्रपटासाठी असिस्ट करत आहे. दीपिका पदुकोणच्या ‘बेशरम रंग’ गाण्याबद्दल बोलायचं तर ‘पठाण’ चित्रपटातील हे गाणं दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे चर्चेत आलं होतं. शाहरुख आणि दीपिकाच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 18:26 IST

संबंधित बातम्या