मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मितालीने नुकतंच अंघोळ करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यावर आता तिचा पती सिद्धार्थ चांदेकरने कमेंट केली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांना ओळखले जाते. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सध्या मिताली ही मध्यप्रदेशात फिरण्यासाठी गेली आहे. यावेळी तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिचा अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. याला तिने ‘अपवित्र’ असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो, कॅप्शन चर्चेत

तिने तिचा हा फोटो पोस्ट करताना पती सिद्धार्थ चांदेकरला टॅग केले आहे. तिच्या या फोटोवर सिद्धार्थनेही मराठीत कमेंट केली आहे. “काय पण हे फोटोस टाकणं. मी एवढ्या लांब असताना”, असे त्याने या फोटोवर कमेंट करत म्हटले आहे.

त्यावर मितालीनेही प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थने केलेल्या या कमेंटवर मितालीने “इशारा समज आणि परत ये” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान या दोघांच्या या संभाषणाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मिताली मयेकर ही सध्या मध्यप्रदेशातील बांधवगड जंगल सफारीवर गेली आहे. हे जंगल व्याघ्र सफारीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जगभरातील वाघांचे दर्शन होतं, असं म्हटलं जाते. सध्या मिताली ही व्याघ्र सफारीचा आनंद घेताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोमुळे सर्वजण थक्क झाले आहेत. या फोटोमुळे मिताली मयेकर ही ट्रोल झाली आहे.