‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे याच्याशी २ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याती अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यापैकी दोन फोटोंची चांगलीच चर्चा झाली. पहिला फोटो स्नेहल शिदम व निखिल बनेचा, तर दुसरा फोटो प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत यांचा होता.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेबरोबरच्या ‘त्या’ रोमँटिक फोटोवर अखेर स्नेहल शिदमने सोडलं मौन; म्हणाली…

प्रियदर्शिनीने या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले होते. या फोटोत तिने अभिनेता ओंकार राऊतबरोबरच एक फोटो शेअर केला होता. यात ती ओंकारच्या छातीवर हात ठेवून हसताना दिसत होती. तर दुसरीकडे ओंकार हा तिच्याकडे पाहत होता. तिच्या या पोस्टवर अभिनेता आस्ताद काळने कमेंट केली होती. ‘ज्या पद्धतीने ओमकार तुझ्याकडे पाहत आहे, एकत्र आणि आनंदी राहा मित्रांनो’ अशी कमेंट आस्तादने या फोटोवर केली होती. त्यानंतर या दोघांच्या अफेअरची व लग्नाची खूप चर्चा रंगली होती. या दोघांनी तर चर्चांवर प्रतिक्रिया दिली नव्हती, पण अभिनेत्री स्नेहल शिदमने मात्र या फोटोबद्दल वक्तव्य केलंय.

View this post on Instagram

A post shared by Priyadarshini Indalkar (@shini_da_priya)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निखिल व स्नेहलचा फोटो व्हायरल झाल्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याची खूप चर्चा झाली, पण निखिल बनेने या सर्व चर्चा खोट्या असल्याचं म्हणत अफवांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर स्नेहल शिदम म्हणाली, “माझा व निखिलचा फोटो व्हायरल झाल्यानंतर निखिलने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यानंतर ओमकार राऊत आणि प्रियदर्शिनीच्या फोटोची चर्चा रंगली. एका फोटोचा विषय संपताच लगेच दुसऱ्या फोटोबदद्ल चर्चा सुरू झाली. प्रियदर्शिनी राऊतांच्या घरची सून होणार, अशा बातम्या आल्या, पण त्यात काहीही तथ्य नाही, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नका.” प्रियदर्शिनी व ओमकारच्या फोटोबद्दलही तसं काहीच नाहीये, असं स्नेहल म्हणाली.