scorecardresearch

स्पृहा जोशी व सायली संजीव एकमेकींना ‘ताई’ का म्हणतात? गुपित उघड करत अभिनेत्री म्हणाली…

वयाने, अनुभवाने स्पृहा सायलीची सीनियर आहे. पण तरीही त्या दोघीही एकमेकींना ताई अशी हाक मारतात.

spruha sayali

अभिनेत्री सायली संजीव आणि स्पृहा जोशी या मराठी मनोरंजन सृष्टीतील दोन आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्या दोघींनी आतापर्यंत कधीही एकत्र स्क्रीन शेअर केलेला नसला तरीही त्यांच्यात खूप घट्ट मैत्री आहे. त्यांची ही मैत्री सोशल मीडियावरून अनेकदा समोर येत असते. आता स्पृहाने त्या दोघींमधलं एक गुपित उघड केलं आहे.

वयाने, अनुभवाने स्पृहा सायलीची सीनियर आहे. पण तरीही त्या दोघीही एकमेकींना ताई अशी हाक मारतात. एकमेकींच्या पोस्टवर देखील त्यांची ही कमेंट अनेकदा पाहण्यात येते. आता त्या एकमेकींना ताई का म्हणतात याचे उत्तर स्पृहाने ‘सेलिब्रिटी कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत दिलं.

आणखी वाचा : “मी ज्यांना प्रपोज केलं त्यांनी…”; सायली संजीवचा प्रेमाबद्दल मोठा खुलासा

स्पृहाने नुकतीच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली होती. तर याच पुरस्कार सोहळ्यात सायली संजीवही उपस्थित होती. त्या दोघींमधलं बॉण्डिंग पाहून “तुम्ही दोघी एकमेकींना ताई का म्हणता?” असा प्रश्न स्पृहाला विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना ती म्हणाली, “ते आमचं आमचं सिक्रेट आहे आणि आत्ता आम्ही ते सगळ्यांना नाही सांगणार. पण त्याही माझ्या ताई आहेत आणि मीही त्यांची ताई आहे.”

हेही वाचा : “दर महिन्याला एक छोटीशी ट्रिप,” स्पृहा जोशीच्या हटके संकल्पाची चर्चा, नेटकरी म्हणाले, “पैसा असल्यावर…”

आता स्पृहाचं हे उत्तर खूपच चर्चेत आलं असून त्या दोघी एकमेकींना ताई का म्हणतात जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 13:39 IST

संबंधित बातम्या