छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची प्रमुख भूमिका असलेली ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन्ही प्रोमोंना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता याच्या तिसऱ्या प्रोमोत प्रेक्षकांना एका नवीन अभिनेत्याची झलक पाहायला मिळत आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे जाणून घेऊयात…

२७ मे पासून रात्री १० वाजता ‘स्टार प्रवाह’वर सुरु होणाऱ्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेविषयी सध्या प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमध्ये राया आणि मंजिरी म्हणजेच अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांची झलक सर्वांना पाहायला मिळाली होती. आता लवकरच मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजेच इन्सपेक्टर जय घोरपडे प्रेक्षकांसमोर येणार आहे.

हेही वाचा : Video: नुपूर शिखरेचं आईसह ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त रील; पत्नी आयरा खानची खास कमेंट, तर सुश्मिता सेनला हसू आवरेना

जय कामात हुशार असला तरी लाचखाऊ आहे. तो जिथे रहातो तिथे त्याचाच दबदबा असतो. लोकांना मदत करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं तो सांगतो पण, एकही काम स्वार्थाशिवाय करत नाही. अडचणीच्या वेळी मदत केल्याचं तो भासवतो पण अडकवणाराही बऱ्याचदा तोच असतो. रिअ‍ॅलिटी शोज गाजवलेला लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे इन्सपेक्टर जय घोरपडेची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : लोकप्रिय हिंदी अभिनेता मराठी सिनेमात झळकणार, ‘या’ चित्रपटात कलाकारांची मांदियाळी, पहिलं लूक पोस्टर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला, “मी पहिल्यांदा पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारतोय. माझे काका पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आव्हान खूप मोठं आहे. व्यायाम माझं पॅशन आहे. या भूमिकेसाठी शरीरयष्ठीवर जास्त मेहतन घेतोय. विशालसोबत याआधी काम केल्यामुळे आमची ओळख होतीच. पूजासोबत पण छान मैत्री जमली आहे. आम्हा तिघांचे सीन्स खूप छान होत आहेत. विशाल आणि पूजा सहकलाकार म्हणून उत्तम आहेत. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाहबरोबरची पहिलीच मालिका असल्यामुळे मी जरा जास्त उत्सुक आहे. मालिकेमुळे घराघरांत पोहोचता येतं. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळावी हीच अपेक्षा आहे.” २७ मे पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.