टीआरपीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी छोट्या पडद्यावर नवनवीन प्रयोग केले जातात. लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची प्रमुख भूमिका असलेली ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेचा काही दिवसांपूर्वी पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याद्वारे मालिकेची वेळ आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. या नव्या मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारीची फ्रेश जोडी झळकणार असल्याने या मालिकेबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच याचा दुसरा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या बैलगाडा शर्यतीचा थरार या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : मोठ्या भावाचे ‘ते’ शब्द ऐकताच भर कार्यक्रमात बॉबी देओल रडला; कपिल शर्माच्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील मालिकेच्या प्रोमोसाठी खास बैलगाडा शर्यतीचं चित्रीकरण केल्याने सध्या नेटकरी मालिकेच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. यामध्ये प्रेक्षकांना राया-मंजिरीची अनोखी प्रेमकहाणी अनुभवायला मिळणार आहे. नानांवरचं कर्ज हलकं करण्यासाठी मंजिरी बैलगाडा शर्यतीत सहभागी होते. शर्यत सुरू होण्याआधी देवाची प्रार्थना करून मंजिरी तिच्या दोन्ही बैलांना नमस्कार करते. हे सगळं पाहून काही केल्या शर्यत तू जिंकणार नाहीस असं राया (विशाल निकम) मंजिरीला सांगतो.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम सायली पोहोचली रणदिवेंच्या घरी हळदीला! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये काय असेल ऐश्वर्याचा नवा डाव?

प्रत्यक्ष शर्यत सुरू झाल्यावर मंजिरीच्या बैलगाडीचं चाक चिखलात अडकतं. हे पाहून राया सगळं सोडून तिच्याकडे येतो आणि तिला चाक बाहेर काढून देतो. पुढे, तुझ्यावर उपकार म्हणून नाहीतर हा सामना बरोबरीचा झाला पाहिजे म्हणून मदत केल्याचं तो मंजिरीला सांगतो. नेटकऱ्यांनी हा प्रोमो पाहून कमेंट्समध्ये असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहे. “प्रोमोच्या बाबतीत स्टार प्रवाहच्या टीमचा कोणीच हात धरू शकत नाही. उत्तम खूप छान”, “असाही प्रोमो येऊ शकतो याचा विचार पण नाही केला”, विशाल दादा म्हणजे विषय खोल आहे…” अशा कमेंट्स मालिकेच्या प्रोमोवर आल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये विशाल पूजाला “मिस फायर…” म्हणून हाक मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता या दोघांची जोडी कशी जमणार याचा उलगडा २७ मे पासून रात्री १०.३० वाजता होणार आहे.