Star Pravah New Horror Show : छोट्या पडद्यावर अलीकडे अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. मराठी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकार मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळत आहेत. अशातच आता लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्याच्या काही आघाडीच्या वाहिन्यांपैकी एक असलेली वाहिनी म्हणजे ‘स्टार प्रवाह’. नुकत्याच या वाहिनीवर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. ‘नशीबवान’, ‘लपंडाव’ या त्यापैकीच एक. अशातच आता लवकरच ‘स्टार प्रवाह’वर अजून एक नवीन मालिका सुरू होणार आहे. वाहिनीने याबद्दल त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन नुकतीच नवीन मालिकेसंबंधीत पोस्ट शेअर केली आहे.
समोर आलेल्या पोस्टमधून “३०० वर्षांनी ती परत येतेय…” असं लिहिलेलं पाहायला मिळतंय. यासह आज १६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता या मालिकेची खास झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची त्यमधून म्हटलं आहे.
वाहिनीने सोशल मीडिया पेजवर शेअर केलेल्या पोस्टखाली प्रेक्षकांनी अनेक कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी एकाने “सांग तू आहेस का २?”, “सांग तू आहेस का भाग २ आणताय का?”, “हिच का ती गूढ रहस्यम मालिका”, “दामिनी २ की सांग तू आहेस का?”, “अनोळखी दिशा पुन्हा सुरू करा” अशा कमेंट्स केलेल्या पाहायला मिळत आहेत.

‘स्टार प्रवाह’ने शेअर केलेल्या पोस्टनुसार आता नेमकं कोणत्या मालिकेचा दुसरा भाग सुरू होणार आहे तसेच ही मालिका नेमकी कशी असणार आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता असलेली पाहायला मिळतेय.
समोर आलेल्या पोस्टरनुसार ही आगामी मालिका गूढ कथानक असलेली असणार असल्याचं यापूर्वी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळतं. त्यामुळे आता या नवीन मालिकेत कोणते कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणंही रंजक ठरणार आहे.
दरम्यान, सध्या ‘स्टार प्रवाह’वर काही नवीन मालिका सुरू झाल्या असून यामधून मराठी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकार झळकत आहे. यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे, अजय पुरकर, सोनाली खरे, कृतिका देव, चेतन वडनेरे, रूपाली भोसले या कलाकारंचा समावेश आहे.