अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांची विनोदी शैली आणि एनर्जी प्रेक्षकांना खूप आवडते. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक सिद्धार्थच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता या भन्नाट कार्यक्रमाचं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याचा जबरदस्त प्रोमो नुकताच समोर आला आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय भन्नाट कार्यक्रम म्हणजे ‘आता होऊ दे धिंगाणा’. ऑगस्ट २०२२मध्ये या भन्नाट कार्यक्रमाची सुरुवात झाली. सिद्धार्थ जाधवने आपल्या जबरदस्त सूत्रसंचालनाने ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्यामुळे दरवर्षी हा कार्यक्रम चांगला गाजताना दिसत आहे. आता तिसऱ्या पर्वाचा मुहूर्त ठरला आहे.

हेही वाचा – “विषय लीलया पेलला”, ‘पाणी’ चित्रपटावर प्रतिक्रिया देताना महेश मांजरेकरांनी आदिनाथ कोठारेचं केलं कौतुक अन् आजकालच्या अभिनेत्रींना दिला सल्ला

‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ जाधव म्हणतोय की, मुक्काम पोस्ट…धिंगाणा बुद्रुक…आपला सिद्धू घेऊन येतोय नवं पर्व.

‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दर शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता सिद्धार्थचा धिंगाणा पाहता येणार आहे. दोन मालिकेच्या टीममध्ये अनोखी सांगितिक लढत पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकतादेखील वाढली आहे.

हेही वाचा – “डोळ्यातून बांध फुटला…”, वडील आणि भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकर झाली भावुक, म्हणाली…

‘आता होऊ दे धिंगाणा’च्या तिसऱ्या पर्वाचा जबरदस्त पोहो पाहून नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अखेर सिद्धू दादा येतोय…खूप वाट पाहिली”, “खूप उत्सुकता आहे”, “व्वा”, “खूप आतुरता होती”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा – ‘सलमान खाननं आता दुसरा गुन्हा केला’, सलीम खान यांच्या टिप्पणीनंतर बिश्नोई समाजाचा संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ सुरू आहे. या कार्यक्रमात सचिन पिळगांवकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत परीक्षक म्हणून पाहायला मिळत आहेत. तर सिद्धार्थ चांदेकर सूत्रसंचालन करत आहे. ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ कार्यक्रमाचा सध्या शेवटचा टप्पा सुरू असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.