Star Pravah Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Off Air : छोट्या पडद्यावर येत्या काळात नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. मात्र, नव्या मालिका सुरू झाल्यावर अनेक जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आजपासून ( २३ डिसेंबर ) ‘तू ही रे माझा मितवा’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी पाहायला मिळेल. ही मालिका १०.३० वाजता प्रसारित केली जाईल.

नवीन मालिकेला १०.३० चा स्लॉट दिल्याने सध्या या वेळेला सुरू असणारी ‘अबोली’ मालिका आता ११ वाजता प्रसारित केली जाईल. तर, गेली चार वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याचा २४ वर्षांचा संसार मोडला, २१ व्या वर्षी वयाने मोठ्या अभिनेत्रीशी कुटुंबियांचा विरोध पत्करून केलेलं लग्न

लोकप्रिय मालिकेने ४ वर्षांनी घेतला निरोप

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ( Star Pravah ) या मालिकेत मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ही मालिका दोन भागांमध्ये प्रसारित करण्यात आली. पहिला भागात गौरी-जयदीप लव्हस्टोरी तसेच शिर्केपाटील कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. मात्र, शालिनी या दोघांना मारते. त्यामुळे गौरी-जयदीपचा नित्या-अधिराजच्या रुपात पुनर्जन्म झाल्याचं मालिकेत पाहायला मिळालं होतं. शेवटच्या भागात माई, मल्हार असे सगळे मिळून नित्या-अधिराजला पाठिंबा देऊन शालिनीला अद्दल घडवतात हे पाहायला मिळालं आणि या मालिकेचा शेवट करण्यात आला.

१७ ऑगस्ट २०२० मध्ये प्रक्षेपित झालेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका तब्बल ४ वर्षांनी ( शेवटचा भाग २२ डिसेंबर ) संपली आहे. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ही मालिका कोठारे व्हिजन्स यांची होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी सर्व कलाकारांची भेट घेण्यासाठी स्वत: महेश कोठारे सेटवर आले होते.

महेश कोठारे यांनी संपूर्ण स्टारकास्टसह केक कापून सर्वांना भावनिक निरोप दिला. तसेच वाहिनीचे सुद्धा आभार मानले. या मालिकेने एकूण १२६१ भाग पूर्ण केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मालिकेची मुख्य नायिका गिरीजा प्रभूला यावेळी अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा : ‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Star Pravah Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Off Air
मालिका संपल्यावर कलाकार झाले भावुक ( Star Pravah Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Off Air )

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ने ( Star Pravah ) शेअर केलेल्या शेवटच्या सेलिब्रेशनच्या व्हिडीओवर, “ही मालिका खूप काही शिकवून गेली, नाती, माणसं, आपुलकी आणि बरंच काही…”, “शालिनीचा अभिनय कमाल होता”, “मालिका संपलीये यावर विश्वासच बसत नाहीये” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.