Star Pravah Serial TRP Updates : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेल्या आठवड्यात ‘ठरलं तर मग’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या तीन मालिकांचा महासंगम पार पडला. हे विशेष भाग रात्री ८:३० ते १० वाजेपर्यंत सलग दीड तास प्रसारित केले जात होते. गोकुळाष्टमीनिमित्त तीन मालिकांचे कलाकार एकत्र येऊन या संपूर्ण महासंगमचं शूट करत होते.
‘स्टार प्रवाह’वरील या तीन मालिकांच्या महासंगम विशेष भागांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ‘ठरलं तर मग’चा निर्माता सोहम बांदेकर तसेच वाहिनीच्या अन्य टीम मेंबर्सनी यासंदर्भातील पोस्ट शेअर करत टीआरपीची आकडेवारी जाहीर केली आहे.
महासंगम विशेष भागात ‘ठरलं तर मग’ मालिकेत खरी तन्वी प्रिया नसून सायलीच आहे हे सत्य मधुभाऊंसमोर उघड झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या अडीच वर्षांपासून प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, मधुभाऊंना सत्य समजल्यावर नागराज त्यांच्यावर हल्ला करतो, सध्या ते कामात असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे. याशिवाय ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मध्ये गायत्रीचा भूतकाळ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये राहुलचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड झाला. याशिवाय आता कलाच्या सासूने सुद्धा तिचा मनापासून सून स्वीकार केल्याचं पाहायला मिळत आहे.
महासंगम विशेष भागात या तिन्ही मालिकांमध्ये हे मोठे ट्विस्ट आल्याने या सगळ्या एपिसोडला चांगला प्रतिसाद मिळाला आणि याची प्रचिती टीआरपीची आकडेवारी पाहून येत आहे. या तीन मालिकांचा महासंगम हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी ‘महासंगम’ ठरला आहे. या विशेष भागांना ५.३ रेटिंग्ज मिळाले असून एकूण ५.३ मिलियन प्रेक्षकांनी हे एपिसोड पाहिले असल्याची आकडेवारी चॅनेलने शेअर केली आहे. तसेच तिन्ही मालिकांमधील कलाकारांचं कौतुक देखील केलं आहे.
१. ठरलं तर मग, थोडं तुझं आणि थोडं माझं, लक्ष्मीच्या पाऊलांनी – ५.३
२. घरोघरी मातीच्या चुली – ४.४
३. कोण होतीस तू काय झालीस तू – ३.९
४. येड लागलं प्रेमाचं – ३.९
५. लग्नानंतर होईलच प्रेम

सोहम बांदेकरने या महासंगमला सर्वाधिक टीआरपी मिळाल्याची आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. या विशेष भागांसाठी कलाकारांनी १२ तासांहून अधिकवेळ शूटिंग केलं होतं. अनेकदा रात्रभर काम करून पहाटे ३ ते ४ वाजता पॅकअप झाल्याच्या पोस्ट देखील हे कलाकार शेअर करत होते. त्यामुळे सगळ्यांची मेहनत फळाला येऊन चांगला टीआरपी मिळवल्याबद्दल संपूर्ण टीमवर निर्मात्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.