विविध मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री प्राची पिसाटने शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी फेसबुकवर आक्षेपार्ह मेसेज केल्याचा दावा प्राचीने तिच्या पोस्ट केला आहे. या पोस्टसह तिने सुदेश म्हशीलकर यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. यामुळे मराठी मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अद्याप सुदेश म्हशीलकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सध्या नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकार प्राचीच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी प्राचीच्या पोस्टवर कमेंट्स करत, तिला वैयक्तिक मेसेज करत पाठिंबा दिला आहे. या सगळ्या कलाकारांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत प्राचीने सर्वांचे आभार मानले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी प्राचीच्या पोस्टवर कमेंट करत म्हणतात, “प्राची एकदम छान केलंस हे पोस्ट करून…इंडस्ट्रीमधल्या अनेकांना वाटतं की, मुली अशाच असतात, त्यांच्यासाठी अव्हेलेबल असतात…असा विचार करणाऱ्या सगळ्यांचा गैरसमज दूर झाला पाहिजे. अशा लोकांमुळे आपली इंडस्ट्री बदनाम होतेय. आम्ही इथे प्रामाणिकपणे काम करून आमच्या कुटुंबीयांबरोबर अगदी प्रामाणिक आहोत.” तर, अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी “वे टू गो प्राची…गप्प नाहीच बसायचं” अशी कमेंट तिच्या पोस्टवर केली आहे.

prachi pisat sudesh mhashilkar
प्राची पिसाटला मराठी कलाकारांचा पाठिंबा
prachi pisat sudesh mhashilkar

प्राची पिसाटला मराठी कलाकारांचा पाठिंबा

याशिवाय रुचिता जाधव, समीर विद्वांस, पूजा ठोंबरे, अजय नाईक, सानिका काशीकर, मीरा जगन्नाथ, श्रुती शैलेश अशा अनेक कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये तसेच प्राचीला मेसेज करत, “तुझ्या धाडसाला सलाम, तुझा अभिमान वाटत आहे” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Prachi Pisat (@prachipisat11.11)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय आहे?

मराठी अभिनेते सुदेश म्हशीलकरांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून प्राचीला “तुझा नंबर पाठव ना, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये कसली गोड दिसते आहेस…हल्ली खूपच सेXX दिसायला लागली आहेस…वाह” असा मेसेज केला होता. प्राचीने याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत सुदेश म्हशीलकरांनी माफी मागावी असं देखील म्हटलं आहे. प्राचीला अनेक मराठी कलाकारांनी पाठिंबा देत या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.