Sukh Mhanje Nakki Kay Asta Off Air : छोट्या पडद्यावर येत्या काही काळात नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. यापैकी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नुकतीच ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यानंतर २३ डिसेंबरपासून ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकांसाठी ‘स्टार प्रवाह’च्या काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

‘स्टार प्रवाह’वर दुपारच्या सत्रात सुरू असणाऱ्या ‘लग्नाची बेडी’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका जवळपास ३ वर्ष सुरू होती. यानंतर आता आणखी लोकप्रिय मालिका ऑफ एअर होणार आहे. १७ ऑगस्ट २०२० मध्ये प्रक्षेपित झालेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका तब्बल ४ वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हेही वाचा : लाडक्या बाबासाठी खास Surprise! रितेश देशमुखच्या वाढदिवशी दोन्ही मुलांनी केली ‘ही’ खास गोष्ट, फोटो आला समोर

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गिरीजाने ( आधीची गौरी, पुनर्जन्मानंतर नित्या ) सेटवरच्या शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचा व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये मालिकेतील सगळे कलाकार एकत्र स्क्रिप्ट वाचत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला, “शूटिंगचा शेवटचा दिवस…जाधव फॅमिली” असं कॅप्शन दिलं आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचा शेवटचा भाग २१ डिसेंबरला प्रसारित केला जाणार आहे. याशिवाय येत्या वीकेंडला या मालिकेची संपूर्ण टीम ‘आता होऊ दे धिंगाणा’ शोमध्ये देखील उपस्थिती लावणार आहे. याचा प्रोमो देखील वाहिनीने नुकताच शेअर केला आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत प्रेक्षकांना अलीकडच्या काही महिन्यांमध्ये गौरी-जयदीपच्या ( नित्या-अधिराज) पुनर्जन्माची कथा पाहायला मिळाली होती. या मालिकेचा टीआरपी सुद्धा चांगला होता. त्यामुळे मालिका ऑफ एअर होत असल्याने याचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत.

हेही वाचा : कॉटनची साडी नेसून लंडन फिरली प्रियदर्शिनी इंदलकर! मराठमोळ्या अभिनेत्रीचा देसी अंदाज पाहून चाहते म्हणाले, “फुलराणी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका संपल्यावर याऐवज ११ च्या स्लॉटला ‘अबोली’ ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. तर, रात्री १०.३० वाजता ‘तू ही रे माझा मितवा’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.