मराठी मालिकाविश्वात सध्या नव्या मालिका येत असून जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याचे सत्र सुरू आहे. यामध्ये काही मालिका टीआरपीमुळे बंद होत आहेत. तर काही मालिकेचं कथानक पूर्ण होत असल्यामुळे बंद केल्या जात आहे. अशातच आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – लवकरच आई होणाऱ्या सई लोकूरला अभिनेत्री क्रांती रेडकरने दिला सल्ला; म्हणाली…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

या लोकप्रिय मालिकेत काही महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळकची एंट्री झाली होती. या मालिकेतून तो नव्या रुपातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण आता या मालिकेतील त्याच्या भूमिकेच चित्रीकरण पूर्ण झालं असून येत्या काही आठवड्यात ही मालिका बंद होणार आहे. याबाबत अभिनेता सुयशने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

हेही वाचा – महाराष्ट्राला खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप; निलेश साबळे म्हणाले, “कायमस्वरुपी…”

हेही वाचा – चिरतरुण अभिनेते अशोक शिंदे यांचं डाएट माहितीये? जाणून घ्या

सुयश टिकळची एंट्री झालेली ही मालिका म्हणजे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘जाऊ नको दूर..बाबा!’ १७ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झालेली ही मालिका गेले दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मन जिंकली होती. आस्ताद काळे, ऋतुजा देशमुख, मयुरी कापडणे, अद्वैत कडणे, स्वप्नाली पाटील अशी तगडी कलाकार मंडळी असलेल्या या मालिकेने ६०० भागांचा टप्पा ऑगस्ट महिन्यात ओलांडला होता. पण आता मालिकेच चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आलं असून लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यासंदर्भातील पोस्ट ‘मराठी टेल बझ’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

हेही वाचा – “…म्हणून अक्षया देवधरेने थांबवली आहेत स्वतःची कामं”; पती हार्दिक जोशीने सांगितलं कारण

दरम्यान, ‘जाऊ नको दूर..बाबा!’ ही मालिका संध्याकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येते. काही दिवसांनंतर या वेळेत नवी मालिका ‘नवी जन्मेन मी…’ ही सुरू होणार आहे.

Story img Loader