यंदाचं वर्ष बऱ्याच कलाकार मंडळींसाठी खास ठरलं आहे. काहींना या वर्षामध्ये जोडीदार मिळाला. तर काही कलाकार आई-बाब झाले. आता अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्याने खास फोटो शेअर करत आपण बाबा होणार असल्याचं सांगितलं आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेता हृषिकेश शेलारच्या घरी लवकरच एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अंकित गुप्ताचा हॉटेल रुममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, बेडवर दिसली मुलगी अन्…

हृषिकेशने त्याच्या पत्नीसह फोटो शेअर करत बाबा होणार असल्याचा आनंद व्यक्त केला. त्याने आपल्या पत्नीबरोबर प्रेग्नंसी फोटोशूटही केलं. हृषिकेशची पत्नी स्नेहा काटेही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिनेही काही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

स्नेहा व हृषिकेशने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला असल्याचं दिसत आहे. तसेच ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. “पाकत्वामध्ये प्रवेश करत आहोत.” असं या दोघांनी फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – अभिनेत्री रेशम टिपणीसवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईच्या निधनानंतर भावूक होत म्हणाली, “तुझा फोन मला…”

‘सुंदरा मनामध्ये भरली’मध्ये हृषिकेश दौलत हे नकारात्मक पात्र साकरतो. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करतात. तर स्नेहा ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील अभिनेत्री काजल काटेची बहिण आहे. काजलनेही बहिणीबरोबर फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.