मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्यात मुग्धा-प्रथमेश, गौतमी-स्वानंद, आशिष-स्वानंदी या जोडप्यांप्रमाणे ‘का रे दुरावा’ फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने ६ डिसेंबरला अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या जोडप्याने लग्नातील एक नवीन Unseen व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सुरुची-पियुषच्या लग्नातील काही खास क्षण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. लाडक्या नवऱ्यासाठी उखाणा घेताना अभिनेत्री म्हणते, “आयुष्यात वळणावर अवचित झाली भेट…मैत्री झाली, प्रेम झालं आता लग्न थेट. सुखी संसार व्हावा हीच प्रार्थना देवाचरणी. पियुषरावांचं नाव घेते भरभरून आशीर्वाद द्या सर्वांनी!”

हेही वाचा : ‘हा’ कार्यक्रम बंद पडला अन् आदेश बांदेकरांच्या ‘होम मिनिस्टर’ ला मिळालेली संधी; नितीन वैद्य यांनी केला खुलासा

सुरुची-पियुषने शेअर केलेल्या लग्नाच्या या व्हिडीओमध्ये सप्तपदी, उखाणा, मेहंदी, हळद, लग्नाला आलेली मित्रमंडळी, वरमाला, दोघांमध्ये असलेलं सुंदर बॉण्डिंग याची झलक पाहायला मिळत आहे. “नव्या प्रवासाला सुरूवात…आमचं प्रेम असंच फुलक राहो” असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे.

सुरुची-पियुषच्या लग्नाला हर्षद अतकरी, भक्ती देसाई, श्रेया बुगडे या कलाकारांनी हजेरी लावली होती. दोघांच्या लग्नातील या सुंदर व्हिडीओवर सध्या नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : “…तर तुला पगारावर घेऊ शकतो”, भाजपाच्या जाहिरातीवरून टीका करणाऱ्याला मराठी अभिनेत्याचे उत्तर; म्हणाला, “मोदीजींमुळे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे सुरुचीला एक वेगळी ओळख मिळाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुरुचीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय पियुष रानडे सध्या कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.