‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका प्रेक्षकांची आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील सूर्या-तुळजापासून ते डॅडी शत्रूपर्यंत सर्व पात्रे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. चार बहि‍णींची जबाबदारी असलेला सूर्या प्रेक्षकांना भुरळ घालतो. तर डॅडी करत असलेली प्लॅनिंग, शत्रूचे मनसुबे प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवतात. आता या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये शत्रूच्या बोलण्यामुळे सूर्याच्या कुटुंबाला टेन्शन आल्याचे पाहायला मिळत आहे.

m

सूर्याचे कुटुंब काळजीत

झी मराठी वाहिनीने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, सूर्याचे कुटुंब तेजूच्या लग्नाची तयारी करीत असून, आनंदात आहे. तुळजाचा भाऊ त्यांच्या घरी येतो आणि म्हणतो, “लग्नाची तयारी चालू आहे वाटतं?” त्यावर तुळजा म्हणते, “आमच्या परीनं जेवढं होतंय ना तेवढं आम्ही नक्कीच करू.” तुळजाच्या या बोलण्याला सूर्या माल हलवत होकार दर्शवतो. शत्रू म्हणतो, “हजार लोक तरी असतील आमच्या बाजूने. त्यामुळे हॉल आहे ना मोठाच बुक केला पाहिजे. नवरदेवाच्या एन्ट्रीला फुलांचं डेकोरेशन कम्पलसरी झालंच पाहिजे. देवदर्शनाला जाताना सनई-चौघडे वाजलेच पाहिजेत. संध्याकाळी वरातीला डॉल्बी, जेवणानंतर आइस्क्रीम कन्फर्म पाहिजे म्हणजे पाहिजे. मुंबईला ना एका मोठ्या दुकानात बस्ता बांधायचा. ५० हजारांची पैठणी घेऊ तिला”, असे म्हणतो आणि छत्रीला म्हणतो, “छत्री, टोटल किती हिशेब होतोय बघ जरा.” त्यावर छत्री काहीतरी हिशेब करतो आणि म्हणतो, “साधारण १८ लाखांत बसतंय सगळं.” तो आकडा ऐकून सूर्यासह सर्वांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “दादा, आपल्या बहिणीच्या लग्नासाठी एवढे पैसे कसे जमा करेल?”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे सूर्याचे कुटुंब फार श्रीमंत नाही. सूर्याच्या कमाईवर त्यांचे घर चालते. त्याच्या चारही बहि‍णींची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो त्यांची काळजी घेतो, त्यांच्यावर खूप प्रेम करतो. आता मालिकेत, तेजूच्या लग्नाची तयारी चालू असल्याचे पाहायला मिळाले आहे. सूर्या आणि त्याच्या कुटुंबाला वाटत आहे की तेजूचे लग्न हे समीर निकमबरोबर होणार आहे. मात्र, डॅडींनी सूर्यासह त्याच्या कुटुंबाला फसवण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. त्यांनीच समीर ऊर्फ पिंट्याला बोलावले आहे. भरमांडवातून पिंट्या गायब होणार आणि मग त्या जागी शत्रूला उभे करायचे. शत्रूबरोबर तेजूचे लग्न लावून द्यायचे, असे डॅडींचे प्लॅनिंग आहे. शत्रूला आधीपासूनच तेजूबरोबर लग्न करायचे आहे. आता त्याची ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: सातव्या आठवड्यात घराबाहेर झालेल्या सदस्याचं नाव आलं समोर, टॉप-२मध्ये असण्याची ‘बिग बॉस’ने केली होती भविष्यवाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, डॅडींचा हा प्लॅन सूर्या किंवा तुळजाच्या लक्षात येणार का आणि तेजू शत्रूची पत्नी होण्यापासून वाचू शकणार का, मालिकेत पुढे काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.