मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. स्वप्निल व त्याच्या आईचा मुलाखतीतील एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

स्वप्निलने आजवर अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीही त्याने गाजवली. परंतु, मराठी सोडून हिंदीत काम करणं स्वप्निलच्या आईला रुचत नव्हतं. त्यामुळेच आईची इच्छा व प्रेमाखातर त्याने मराठी कलाविश्वात काम करण्याचा निर्णय घेतला. कानाला खडा या कार्यक्रमात स्वप्निल व त्याच्या आईने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे.

हेही वाचा>> सुश्मिता सेन व ललित मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही टाकलं मागे; सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप १० व्यक्तींची यादी समोर

स्वप्निलच्या आईचा नुकताच वाढदिवस झाला. याच निमित्ताने एका फॅन पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. “हिंदीत उत्तम काम सुरू होतं. पण तरीही तू ठरवून मराठी कलाविश्वात येण्याचा निर्णय घेतला. नेमकं यामागचं कारण काय होतं?” असा प्रश्न संजय मोने यांनी स्वप्निलला विचारला. यावर उत्तर देत तो म्हणाला “आईमुळे, कारण मी हिंदीत कितीही मोठं काम केलं. माझ्या शोचा टीआरपी इतका आहे. नंबर वन शो आहे, असं घरी येऊन सांगितलं. तर आई मला एकच म्हणायची मराठीत काम करुन दाखव तर मानते”.

हेही वाचा>>अवघ्या एका महिन्याच्या लेकीला घरी सोडून आलिया भट्ट करतेय योगा; नेटकरी म्हणतात…

हेही वाचा>> हार्दिकशी लग्नगाठ बांधल्यानंतर अक्षया भावूक; लग्नाची तारीख कोरलेल्या नखांचा फोटो शेअर करत म्हणली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वप्निलच्या उत्तरानंतर संजय मोने त्याच्या आईला याबाबत विचारतात. त्या उत्तर देत म्हणतात, “मराठी आपली मातृभाषा आहे आणि आपल्या लोकांसाठी आपण आधी काम केलं पाहिजे. हिंदी भाषिक आपले नाहीत, असं नाही. तेही आपलेच आहेत. पण त्याने मराठीत काम केलं पाहिजे, असं मला कुठेतरी वाटत होतं. आणि त्याने माझं ऐकलं. याबद्दल मला त्याचा अभिमान आहे”. सध्या स्वप्निल ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.