छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबीता म्हणजे मुनमुन दत्ता परदेशात फिरायला गेली होती. गेल्या काही दिवसांपासून ती हाँगकाँग, स्वित्झर्लंडमधील फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर करत होती. याच परदेशवारीदरम्यान मुनमुनचा अपघात झाला आहे. मुनमुनच्या गुडघ्याला लागलं आहे. अभिनेत्रीने स्वतः पोस्ट शेअर करून तिच्या अपघाताची माहिती दिली. तसेच तिने भारतात परतण्याबद्दलही माहिती दिली आहे.
मुनमुन दत्ताने 21 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून अपघाताविषयी माहिती दिली. तिने लिहिलं, ‘जर्मनीमध्ये माझा छोटासा अपघात झाला आहे. माझ्या डाव्या गुडघ्याला खूप दुखापत झाली आहे. मला माझी ट्रीप कॅन्सल करून घरी परतावं लागतंय.’ मुनमुनने पोस्टच्या शेवटी तुटलेल्या हृदयाचा इमोजीही टाकला आहे. अपघातामुळे त्याला आपली युरोप ट्रीप लवकर संपवावी लागल्याचं मुनमुनने इन्स्टाग्रामवरून सांगितलं.

दरम्यान, मुनमुनच्या अपघाताबद्दल माहिती मिळाल्यानंतर चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, मुनमुन दत्ता जर्मनीपूर्वी स्वित्झर्लंडमध्ये फिरत होती. तिला जर्मनीला जाऊन दोनच दिवस झाले होते. मुनमुन दत्ता स्वित्झर्लंडमधील फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत होती. या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता खूप खुश दिसत होती. पण दुर्दैवाने तिचा अपघात झाला आणि आता तिला प्रवास अर्धवट सोडून घरी परतावे लागले आहे. मुनमुन दत्ता कामातून ब्रेक घेऊन युरोप फिरायला गेली होती.