‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोने लोकांना खूप हसवले आणि आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मध्यंतरी या मालिकेतील ‘चंपक चाचा’ यांना चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे हा शो चर्चेत आला होता. सेटवर त्यांना दुखापत झाल्याचे कळल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक गोष्टी कानावर आले होते. चंपक चाचा म्हणजेच अभिनेते अमित भट्ट यांनीदेखील एक व्हिडीओ पोस्ट करत स्वतःच्या तब्येतीची माहिती दिली होती.

डॉक्टरांनी अमित भट्ट यांना काही दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळेच आता ते चित्रीकरण करू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. चंपकलाल हा शो सोडून जात असल्याची अफवादेखील मध्ये आली होती आणि यामुळेच त्या शोचे चाहतेदेखील चांगलेच नाराज झाले होते.

आणखी वाचा : Richa Chaddha Controversy : वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाच्या विरोधात प्रसिद्ध निर्मात्याकडून तक्रार दाखल

चंपक यांना झालेल्या या दुखापतीमुळे काही दिवस ते या शोमध्ये दिसणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मध्यंतरी या शोच्या निर्मात्यांबरोबर खटके उडल्याने काही कलाकार यातून बाहेर पडले आहेत अशीदेखील चर्चा रंगली होती. अशातच अमित भट्ट यांच्या न दिसण्याने ती शक्यता आणखी दाट झाली, पण ते त्यांच्या दुखापतीमुळे याच्या चित्रीकरणापासून लांब आहेत हे स्पष्ट झाल्यावर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेली कित्येक वर्षं ही मालिका सुरू आहे. यातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. दिवसागणिक या मालिकेचा चाहतावर्ग वाढतानाच दिसत आहे. आता चंपकलाल म्हणजेच अमित भट्ट लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा सेटवर परतावेत म्हणून डॉक्टरांप्रमाणेच या शोच्या निर्मात्यांनीदेखील त्यांना पाठिंबा देत विश्रांती घेण्यास सांगितले. आता ते बरे होऊन कधी सेटवर परतणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.