रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धानंतर आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध सुरू आहे. शनिवारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यामुळे या युद्धाला तोंड फुटले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. तसेच असंख्य नागरिक जखमी झाले आहेत. अशा स्थितीत बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती. पण ती रविवारी सुखरुपरित्या भारतात परतली. नुसरतप्रमाणे आणखी एक अभिनेत्री इस्रायलमध्ये अडकली असती. याचा खुलासा त्या अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियाद्वारे केला आहे.

हेही वाचा – Video: इस्रायल-पॅलेस्टाईनच्या युद्धावर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, “जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत…”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता इस्रायलला जाणार होती. याबाबत तिने स्वतः इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. मुनमुन दत्ताने स्टोरीमध्ये लिहीलं आहे, “मला या गोष्टीचा विचार करून ही अंगावर काटा येतो आहे की, मी आता इस्रायलमध्ये असते. माझं तिकीट देखील बूक झालं होतं. पण इस्रायलला जाण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. कारण अचानक माझ्या नाइट शिफ्टची वेळ आणखी वाढवण्यात आली. कारण काही सीन्स वाढवण्यात आले. त्यावेळी मला वाईट वाटलं होतं, पण आता मला पटलं आहे की, एक मोठी शक्ती आहे जिने मला या सगळ्यातून वाचवलं, ज्यातून कदाचित माझा जीव ही जाऊ शकला असता.”

हेही वाचा – “आपल्या इतिहासात चंदन अन् कोळसा आहे, मी… ” दिग्पाल लांजेकरांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाले…

पुढे मुनमुनने लिहीलं आहे की, कृतज्ञता कशी व्यक्त करावी हेच कळतं नाहीये. हे सत्य सिद्ध करत की, देव आहे. जे काही होत ते चांगल्यासाठी होतं. इस्रायलला आणि जगाला शांतता मिळेल, अशी आशा आहे.

हेही वाचा – Video: शर्मिष्ठा राऊतचे ‘हे’ शब्द ऐकताच स्वप्नील जोशी झाला थक्क; मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हे शब्द भाषेमधून काढून टाका”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आतापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धात दोन्ही बाजूचे मिळून तब्बल ११०० मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. इस्रायलमध्येच ७०० नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. त्याशिवाय, मृतांमध्ये ४४ सैनिकांचाही समावेश आहे. दुसरीकडे गाझा पट्टीत किमान ४०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.