TMKOC fame Bhavya Gandhi on engagement with Munmun Dutta: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील कलाकार विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता भव्य गांधी हा अभिनेता त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत भव्य गांधी टप्पूची भूमिका साकारत होता. २००८ मध्ये टप्पूने या मालिकेत काम करायला सुरुवात केली होती. तो या मालिकेत २०१७ पर्यंत काम करीत होता. २०१७ ला त्याने ही मालिका सोडली. त्यानंतर तो गुजराती चित्रपटसृष्टीत काम करीत आहे.

भव्य गांधी आणि या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी सारपुडा केला आहे, अशा चर्चा ऐकायला मिळाल्या. भव्य गांधी आणि मुनमुन दत्ता यांच्यातील वयाचे अंतरही मोठ्या चर्चेत होते. त्यांच्यात १० वर्षांचे अंतर आहे.

“एका व्यक्तीने माझ्या…”

आता भव्य गांधीने नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला मुनमुन दत्ताबरोबरच्या साखरपुड्याबद्दलच्या चर्चांबद्दल विचारले. त्यावर भव्य गांधी म्हणाला, “पहिली गोष्ट म्हणजे ज्या टप्पूविषयी चर्चा झाल्या, तो मी नाही. या चर्चांनंतर मला आणि माझ्या आईला याबाबत बरेच फोन आले. पण, मला हे स्पष्ट करायचे आहे की, मी टप्पू हे पात्र साकारले आहे; परंतु ज्याच्याबद्दल चर्चा झाल्या, तो मी नाही.”

भव्य पुढे किस्सा सांगत म्हणाला, “एका व्यक्तीने माझ्या आईला फोन केला आणि सांगितले की, तुमच्या मुलाचा साखरपुडा होत आहे. ते ऐकल्यानंतर माझ्या आईला राग आला. माझ्या आईने त्याला चांगलेच सुनावले. हे सगळे अचानक घडले होते. पण, या सगळ्या अफवा होत्या. माहीत नाही, हे सगळं कसं घडलं होतं?”

मुनमुन दत्ताबद्दल अभिनेता म्हणाला, “मी मुनमुन दत्ताला माझ्या मोठ्या बहिणीसारखे मानतो. मी तिच्याकडून अनेक गोष्टी शिकलो आहे.”

याच मुलाखतीत त्याला तो शोमध्ये पुन्हा येणार का, असे विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, “मला पुन्हा शोमध्ये काम करायला नक्कीच आवडेल. मला आजही आठवते की, ५०० मुलांनी टप्पूच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्यातून माझी त्या भूमिकेसाठी निवड झाली होती. मी स्वत:ला नशीबवान समजतो की, मी त्यां शोचा भाग होतो. टप्पू ही भूमिका माझ्या अभिनयाच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा भाग असेल.

दरम्यान, आता भव्य गांधी मालिकेत पुनरागमन करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.