छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’कडे पाहिले जाते. ही मालिका सातत्याने चर्चेत असते. अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणून तिला ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात प्रसिद्ध आहे. त्याबरोबरच चंपकलाल, टपू, आत्माराम भिडे, बबिता, अय्यर गोली, हाथी हे सर्व सहकलाकारही तितकेच लोकप्रिय आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सर्वच कलाकार हे सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेतील कलाकारांप्रमाणेच याचे सोशल मीडिया पेजही कायम सक्रीय असते. या मालिकेतील अनेक व्हिडीओ, फोटो हे या पेजवर पाहायला मिळतात. तसेच या मालिकेच्या पेजकडून कायमच चाहत्यांसाठी काही स्पर्धा आयोजित केल्या जातात. नुकतंच या पेजने चाहत्यांसाठी एक अनोखे चॅलेंज दिले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या फेसबुक पेजने चाहत्यांना एक टास्क दिला आहे. यात त्यांनी साम्य दिसणारे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यावर त्यांनी या दोन चित्रपटांमधील फरक ओळखा असे चॅलेंज दिले आहे. या चित्रपटातील ३ फरक ओळखून दाखवा आणि त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, असे चॅलेंज त्यांनी दिले आहे.

त्यावर अनेकांनी विविध उत्तर दिली आहे. या चित्रपटातील फरकही अनेकजण सांगताना दिसत आहे. या चित्रपटात एकूण पाच फरक पाहायला मिळत आहेत. हे फरक ओळखताना अनेकांची दमछाक होताना दिसत आहे.

tarak mehta ka ooltah chashmah

या चित्रपटात एकूण पाच फरक पाहायला मिळत आहेत. यातील पहिला फरक म्हणजे अय्यरच्या शेजारी असलेला फ्लॉवर वॉस, जेठालालच्या शर्टावर असणारी डिझाईन, बबिताच्या मागील भिंतीवर असलेला अय्यरचा फोटो, बबिताने परिधान केलेल्या टॉपवर डिझाईन आणि जेठालालच्या मागे असलेली मूर्ती या गोष्टी एका फोटोत गायब असल्याचे चाहत्यांचे म्हणणं आहे. अनेकांनी या फोटोतील हे फरक अगदी अचूकरित्या ओळखले आहेत.