कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा’ शो प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास भाग पाडतो. मध्यंतरी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेते शैलेश लोढा यांनी या कार्यक्रमावर टीका केली होती. कपिलचा हा शो अश्लिल असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर बराच वाद रंगला होता. त्यांनी या शोबाबत केलेलं वक्तव्य त्यांच्याच अंगाशी आलं. आता बऱ्याच दिवसांनंतर शैलेश यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. तसेच कपिल माझा चांगला मित्र असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आरजे सिद्धार्थ कननच्या शोमध्ये शैलेश लोढा यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी या प्रकरणाबाबत भाष्य केलं. शैलेश म्हणाले, “कपिल शर्माच्या शोबाबत अशा प्रकारचं भाष्य मी कधीच केलं नाही. छोट्या पडद्यावर दाखवण्यात येणारे असे काही शो आहेत जे अश्लिल आहेत असं मी म्हटलं होतं. ज्या शोमध्ये एक आजी लोकांना किस करते याबाबत मी प्रतिक्रिया दिली होती.”

“विनोद करण्याचे इतरही मार्ग आहेत. हे कोणत्या एकाच शोसाठी नव्हतं. लोकांनी याचा संदर्भ वेगळ्या गोष्टीशी जोडला. कपिल व मी एकाच मंचावर काम केलं आहे. टीव्हीवर वाढणाऱ्या अश्लिलतेबाबत मी भाष्य केलं. कोणावरही वैयक्तिक टीका मी केली नाही. कपिल माझा चांगला मित्र आहे आणि तो एक उत्तम कलाकार आहे. त्याच्याबाबत मी कधीच असं बोलणार नाही.” असंही शैलेश म्हणाले.

आणखी वाचा – Photos : वयाची ४५शी ओलांडल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांच्या बोल्ड अन् हॉट लूकपुढे तरुण अभिनेत्री फिक्या, नव्या मराठी मालिकेमुळे चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका कवी संमेलनदरम्यान “मी टीव्हीवरील काही कार्यक्रम पाहतो तेव्हा मला लाज वाटते. एक आजी जी प्रत्येक व्यक्तीला किस करू इच्छिते. एक अशी आत्या जी लग्नासाठी उतावळी आहे. एक पती जो आपल्या पत्नीचा अपमान करतो. मी त्या कार्यक्रमामध्ये काम करतो जिथे एक मुलगा प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या वडिलांच्या पाया पडतो.” शैलेश यांचं हे वक्तव्य प्रचंड चर्चेत आलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा संबंध ‘द कपिल शर्मा’ शोबरोबर जोडण्यात आला.