अभिनेता अजय देवगण सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या ‘दृश्यम २’ या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगली उत्सुकता लगावून राहिली आहे. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता वाढवण्यासाठी या चित्रपटाची टीम वेळोवेळी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काही ना काही अपडेट्स देत असते. सध्या अजय देवगण आणि तब्बू या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यासाठी अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावताना दिसत आहेत. अशातच तब्बूने अजय देवगणचे एक गुपित उघड केलं आहे.

‘दृश्यम २’च्या प्रमोशनच्या निमित्ताने अजय देवगन आणि तब्बू यांनी ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळेस स्पर्धकांबरोबर आणि परीक्षकांबरोबर या दोघांनी खूप मजा केली. तसेच काही खेळही यावेळी त्यांनी खेळले. एका खेळा दरम्यान त्यांना एकमेकांबद्दलच्या काही गोष्टी उघड करायच्या होत्या. त्या करताना तब्बू ने अजयबद्दल कोणालाही माहित नसलेली एक गोष्ट शेअर केली.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

आणखी वाचा : “पौराणिक व्यक्तिरेखांचा त्यांना…”; क्रिती सेनॉनचे ओम राऊतबद्दल मोठे वक्तव्य

या कार्यक्रमात तब्बूला विचारण्यात आले की “अजयला कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते?” या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, “बंद जागा.” अजयला बंद जागांची खूप भीती वाटते. तर दुसरीकडे हाच प्रश्न अजयला तब्बूबद्दल विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “तब्बू झुरळांना खूप घाबरते. मी कोणताही प्राण्याला घाबरत नाही. पण ती घाबरते.” अजयच्या या उत्तरावर उपस्थित सर्वजण हसायला लागले.

हेही वाचा : “इन्स्पेक्टर मीरा देशमुख हे पात्र लिहिणाऱ्यांना…” तब्बूने केले ‘दृश्यम २’मधील भूमिकेमागचे गुपित उघड

अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम २’ १८ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. २०१४ साली आलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा हा पुढील भाग असणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. या चित्रपटात अजयसह श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका होत्या. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ६७.१७ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. आता याचा दुसरा भाग येत्या १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.