‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोने लोकांना खूप हसवले आणि आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण नुकतीच या मालिकेतील ‘चंपक चाचा’ यांना चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे हा शो चर्चेत आला आहे. सेटवर त्यांना दुखापत झाल्याचे कळल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक गोष्टी कानावर येत आहेत. आता चंपक चाचा म्हणजेच अभिनेते अमित भट्ट यांनीच एक व्हिडीओ पोस्ट करत स्वतःच्या तब्येतीची माहिती दिली.

अमित भट्ट व्हिडीओमध्ये म्हणाले, “नमस्कार मी अमित भट्ट. मी मजेत आहे आणि तुमच्या समोर आहे. तुम्ही सगळे कसे आहात? गेले दोन दिवस माझ्या तब्येतीबद्दल विविध प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. सोशल मीडियावर मला फार गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. पण तसं काहीही झालेलं नाही. मला खूप किरकोळ दुखापत झाली आहे.”

हेही वाचा : Video: लेकीच्या साखरपुड्यात आमिर खानचा ‘पापा कहते हैं’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

पुढे ते म्हणाले, “‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या सेटवर एक सीन शूट केला जाणार होता, ज्यामध्ये सोढीच्या कारचा टायर आमच्या हातातून सुटतो आणि त्या टायरला पकडण्यासाठी आम्ही सगळे त्याच्या मागे धावतो. पण शूटिंगदरम्यान तो टायर रिक्षाला आदळून मागे आला आणि माझ्या गुडघ्यावर आदळला. त्यामुळे मला किरकोळ दुखापत झाली. डॉक्टरांनी मला थोडी विश्रांती घ्यायला सांगितली आहे. तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल एवढी काळजी दाखवलीत आणि मला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. मी लवकरच सेटवर परत येईन.”

आणखी वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’तील ‘चंपक चाचा’ यांना मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत, निर्माते काळजीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते लवकरच बरे होऊन पुन्हा सेटवर परतावेत म्हणून डॉक्टरांप्रमाणेच या शोच्या निर्मात्यांनीदेखील त्यांना पाठिंबा देत विश्रांती घेण्यास सांगितले. आता ते बरे होऊन कधी सेटवर परतणार याची त्यांचे चाहते वाट पाहत आहेत.