बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता विकी कौशलने अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘मसान’, ‘उरी’, ‘राझी’ यांसारख्या चित्रटातून विकी कौशलने अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. सध्या विकी कौशल सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम शैलेश लोढा यांनी विकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेता शैलेश लोढा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विकी कौशलबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांनी विकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “विकी कौशल एक उत्तम व लोकप्रिय अभिनेता आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु, त्याहीपेक्षा विकी एक उत्कृष्ट व्यक्ती आहे. विकीचा नम्रपणा, जेष्ठ व्यक्तींप्रती असलेला आदर व त्याचा सरळ स्वभाव यामुळे तो सर्वांपेक्षा वेगळा ठरतो. विकीला माझ्याबद्दल वाटणारा आदर व माझ्या त्याच्याबद्दलच्या प्रेमाला सीमा नाही” असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> ‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार आशुतोषच्या मैत्रिणीची एन्ट्री; अनुष्काच्या येण्याने अरुंधती निर्णय बदलणार?

पुढे त्यांनी पोस्टमध्ये “आज बऱ्याच दिवसांनी विकी कौशलची अचानक भेट झाली. भेटल्यानंतर तो मला काय योगायोग आहे. दोन दिवसांपूर्वीच तुमच्याबद्दल बोलत होतो शैलेश भाई, असं म्हणाला. विकी तू मला भावासारखा आहे. तू आयुष्यभर आहे तसाच राहा. तुझ्यासारख्या फार कमी व्यक्ती असतात”, असंही म्हटलं आहे.

हेही वाचा >> प्राजक्ता माळीच्या वडिलांना आहे जुळी बहीण, बाबांचा ६१वा वाढदिवस साजरा करतानाचा फोटो शेअर करत म्हणाली…

हेही पाहा>> Unseen Photos: ‘चंद्रा’ची पहिली लूक टेस्ट ते शूटिंगचा शेवटचा दिवस, अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने शेअर केले खास फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शैलेश लोढा यांनी विकी कौशलसाठी लिहिलेल्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनीही लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.