पावसाळा सुरु झाला की, बरेच कलाकार मुंबईबाहेर निर्सगरम्य वातावरणात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जातात. अलीकडेच मराठी कलाविश्वातील दोन प्रसिद्ध अभिनेत्री एकत्र पावसाळी ट्रेकला गेल्या होत्या. दोघींनीही या ट्रेकचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु, या दोन्ही आघाडीच्या अभिनेत्रींना एकत्र पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हेही वाचा : ‘जवान’च्या ट्रेलरला अवघ्या २४ तासांत मिळाले ‘इतके’ व्ह्यूज; नेटकरी म्हणाले, “आता सोशल मीडिया प्रमोशनशिवाय…”

‘होणार सून मी या घरची’ फेम अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्री शिवानी बावकर पावसाळी ट्रेकला एकत्र गेल्या होत्या. ट्रेकसाठी दोघींनीही मुंबईपासून ८० किलोमीटरवर कर्जतजवळ असलेल्या ‘गारबेट पॉईंट’ची निवड केली होती. ‘गारबेट पॉईंट’ ट्रेक जवळपास दोन तासांचा आहे. तेजश्री प्रधानने या संपूर्ण ट्रेकचा वेगळा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “सना सेटवर आमच्याबरोबर कधीच जेवली नाही, कारण…”, ‘बाईपण भारी देवा’च्या अभिनेत्रींनी केदार शिंदेंच्या लेकीचे केले कौतुक

तेजश्रीने शिवानी बावकरबरोबर ट्रेकचे फोटो शेअर करत त्याला “मी माझ्या लाडक्या मैत्रिणीबरोबर जंगलात फिरतेय…” असे कॅप्शन दिले आहे. दोघींच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने, “तुम्ही दोघी मैत्रिणी कधी झालात…कळलच नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने यावर “तुम्ही दोघी आणि पुढे रेड हार्ट इमोजी” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने कसं कमी केलं वजन? व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “बरोबर ६ आठवड्यांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘होणार सून…’ नंतर तेजश्री प्रधानच्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तर दुसरीकडे ‘लागिरं झालं जी’नंतर अभिनेत्री शिवानी बावकर सध्या ‘झी मराठी’वरील ‘लवंगी मिरची’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.