Tejashri Pradhan Himachal Pradesh Trip Video: ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मराठी सिने आणि मालिकाविश्वातील ती आघाडीची अभिनेत्री आहे. तेजश्रीची कोणतीही भूमिका असो प्रेक्षक ती डोक्यावर घेतात. सध्या तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. नुकतीच ती हिमाचल प्रदेशला फिरायला गेली होती. याचा पहिला रील व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

तेजश्री प्रधानने इरफान खान आणि राधिका मदान यांच्या ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटातील ‘एक जिंदगी मेरी…मै जीना पूरी तरह’ या गाण्याच्या ओळी लिहीत रील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तेजश्रीने हिमाचल प्रदेशच्या ट्रीपमध्ये काय-काय केलं? हे पाहायला मिळत आहे. या ट्रीपमध्ये तेजश्रीबरोबर तिची खास मैत्रीण नमिता बांदेकर होती. तीदेखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तेजश्री प्रधान हिमाचल प्रदेशची सफर करताना दिसत आहे. हिमाचलच्या निर्सगरम्य वातावरणाचा ती आनंद घेताना पाहायला मिळत आहे. डोंगर, पर्वत रांगा, नदी, फुलांची बाग असं सर्वकाही तेजश्रीच्या व्हिडीओत दिसत आहे. तसंच नदी किनारी पुस्तक वाचताना अभिनेत्री पाहायला मिळत आहे. तेजश्रीच्या हिमाचल प्रदेशच्या ट्रीपच्या या रील व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तेजश्री हिमाचलमधील गुशैनी इथे फिरायला गेली होती.

View this post on Instagram

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकते. कारण काही दिवसांपूर्वी ती ‘छावा’ चित्रपटात झळकलेल्या शुभंकर एकबोटेबरोबर काम करताना दिसली होती. शुभंकरने सेटवरीला फोटो शेअर करून तेजश्री प्रधानला पोस्ट टॅग केली होती. अभिनेत्याने सेटवरील कॅमेराचा फोटो शेअर करत लिहिलं होतं की, “हॅलो मित्रा…आयुष्यभराचा सर्वात चांगला मित्र…” हे कॅप्शन त्याने कॅमेराला उद्देशून लिहिलं होतं. तसंच #somethingnew असंदेखील लिहिलं होतं. त्यामुळे या पोस्टमधून शुभंकर आणि तेजश्री लवकरच एकत्र झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.