Tejashri Pradhan’s new beginning: अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे.

याआधी अभिनेत्री ‘होणार सून मी या घरची’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘अग्गबाई सासूबाई’ अशा मालिका आणि ‘ती सध्या काय करते’, ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ अशा चित्रपटांत दिसली आहे. तिची प्रत्येक भूमिका लोकप्रिय ठरली आहे. आज तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

तेजश्री प्रधानची नवी सुरुवात

अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने हा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिने तिची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अभिनेत्री नवीन सुरुवात करणार आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

तेजश्री तिच्या कामाबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असते. ती तिच्या कामाबाबत तसेच तिच्या आयुष्यातील खास गोष्टी शेअर करत असते. आता अभिनेत्री लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कोणाशीतरी बोलताना दिसत आहे. ती व्यक्ती तिला सीन समजावून सांगत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना नवीन वेब सीरिज आणि नवीन काम सुरू आहे हे हॅशटॅग दिले आहेत. त्यामुळे आता तेजश्री चित्रपट आणि मालिकानंतर एका वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम

आता ही वेब सीरिज हिंदीमध्ये आहे की मराठीमध्ये आहे, वेब सीरिजचे नाव काय आहे, तेजश्रीची भूमिका कशी आणि कोणती असणार आहे, ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार आहे आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. आता तेजश्री या सगळ्याबाबत कधी खुलासा करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या तेजश्री झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत दिसत आहे. याच मालिकेत अभिनेता सुबोध भावेदेखील प्रमुख भूमिकेत आहे. सध्या मालिकेत समर व स्वानंदी आणि रोहन व अधिरा यांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, आता तेजश्रीची ही वेब सीरिज कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.