‘ठरलं तर मग’ या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये अभिनेत्री जुई गडकरीने सायली, तर अभिनेता अमित भानुशालीने अर्जुन हे पात्र साकारले आहे. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट लग्नाची गोष्ट अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या मालिकेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र, आता पुन्हा एकदा अर्जुन सुभेदार मधुभाऊंच्या केसची विशेष तयारी करणार आहे. मालिकेचा आगामी भागाचा प्रोमो अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “तिचा निरोप घेताच…”, आजीच्या निधनानंतर अभिज्ञा भावेची भावुक पोस्ट; म्हणाली, “प्रिय आजी…”

मधुभाऊंच्या केस पुन्हा एकदा रिक्रिएट करून अर्जुन खोट्या तन्वीला अर्थात प्रियाला प्रश्न विचारत असल्याचे या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अर्जुनच्या प्रश्नांची उत्तरं देताना प्रिया काहीशी अडखळते, त्यामुळे तिचा खोटेपणा सर्वांसमोर उघड होणार का? हे प्रेक्षकांना मालिकेच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : “नऊवारी साडी, नाकात नथ अन् पायात…”, ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचा मराठमोळा लूक, नेटकरी म्हणाले, “मराठी…’

‘ठरलं तर मग’ मालिकेचा महाएपिसोड १७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रसारित केला जाणार आहे. याचा खास प्रोमो अभिनेत्री जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यावर “हा एपिसोड पाहायला विसरू नका” असं कॅप्शन दिलं आहे. नव्या प्रोमोमध्ये अर्जुन सुभेदार महाएपिसोडमध्ये प्रियाला मर्डर केससंदर्भात विविध प्रश्न विचारून तिचं सत्य सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच दुसरीकडे सायली देवी आईकडे प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर उघड कर अशी प्रार्थना करत आहे.

हेही वाचा : “…त्यादिवशी मी अभिनयातून निवृत्ती घेईन,” करीना कपूरचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ही गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.