Tharala Tar Mag Fame Amit Bhanushali Son Hridhaan : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका गेली अडीच वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली व अभिनेत्री जुई गडकरीने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अमित-जुई या मालिकेत अर्जुन व सायली सुभेदार या भूमिका साकारत आहेत.

आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडतं. अर्जुन सुभेदार ही भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. कधी सेटवरचे तर कधी कौटुंबिक रील्स व्हिडीओ अभिनेता चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अमित व त्याच्या पत्नीने नुकताच त्यांचा मुलगा हृधानचा गोड व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अमित भानुशालीच्या पत्नीचं नाव श्रद्धा असून, तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हृधान “सारेगमप…” गाताना दिसत आहे. श्रद्धा पोस्ट शेअर करत लिहिते, “हृदान ABCD शिकण्याआधी ‘सारेगमप…’ गायला शिकला.”

अमित आणि श्रद्धा हृधानचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. याशिवाय हृधानचं सोशल मीडिया पेजही आहे. अर्जुनने यंदा ‘फादर्स डे’च्या निमित्ताने ‘स्टार प्रवाह’ला दिलेल्या मुलाखतीत हृधानविषयीची खास आठवण सांगितली होती.

“जेव्हा हृधानला मी पहिल्यांदा माझ्या हातात घेतलं होतं…तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. आठवणीतला दुसरा क्षण म्हणजे जेव्हा तो मला पहिल्यांदा बाबा म्हणाला होता…या दोन्ही गोष्टी मी कधीच विसरू शकणार नाही. मी जेव्हा शूटिंगवरून घरी जाऊन झोपतो तेव्हा तो माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला झोप-झोप असं प्रेमाने सांगतो. जेवढं प्रेम मी त्याच्यावर करतो, तेवढंच त्याचंही माझ्यावर प्रेम आहे…अजून आमच्या दोघांच्या आयुष्यात खूप असे आठवणीत राहणारे क्षण येतील.” असं अमित भानुशालीने हृधानविषयी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये अमित-जुईसह प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता कुलकर्णी, सागर तळाशीकर, शिल्पा नवलकर, ज्योती चांदेकर, मोनिका दबाडे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.