Tharala Tar Mag Marathi Serial : वात्सल्य आश्रमाच्या केसचा निकाल लागण्यासाठी आता अवघे १५ दिवस उरले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पुरावे शोधण्यासाठी अर्जुन धडपड करत असल्याचं सध्या मालिकेत पाहायला मिळतंय. नुकताच अर्जुन सरंजामे यांच्या घरी पोहोचला होता. यावेळी सरंजामे देखील महिपतला सामील असल्याचा संशय अर्जुनला येतो. सरंजामेला तो थेट ताकीद देतो पण, अर्जुनकडे महत्त्वाचे पुरावे नसतात. आता अवघ्या १५ दिवसांत सगळ्या गोष्टी कशा मार्गी लावायच्या या विचारात अर्जुन आहे.

आश्रमात सापडलेलं साक्षीचं अर्ध पेंडंट हा आश्रम केसमधील सगळ्यात मोठा पुरावा असल्याचं अर्जुनला माहिती असतं. त्यामुळे आता काहीही करून पुन्हा एकदा साक्षी शिखरेच्या घरी शोधाशोध करायला जावं लागेल असं तो सायलीला सांगतो. व्हिजिटिंग कार्ड आणि पेडंटचा तुकडा या दोन्ही वस्तू कोर्टात सादर केल्यावर निकाल नक्की फिरेल याची खात्री अर्जुनला असते.

याच पार्श्वभूमीवर साक्षीच्या घरातील सर्वात महत्त्वाचा पुरावा शोधण्यासाठी आता अर्जुन एक वेगळंच रुप घेणार आहे. पिकलेले लांब केस, मोठी दाढी असा वेगळाच लूक करून अर्जुन साक्षी शिखरेच्या घरी जाणार आहे.

साक्षीच्या आईची पुण्यतिथी असते, याचदरम्यान गुरुजींच्या वेशात अर्जुन साक्षी-महिपतच्या घरी जाणार आहे. यावेळी त्याठिकाणी प्रिया देखील उपस्थित असते. मात्र, अर्जुन वेगळ्या रुपात साक्षीच्या घरी आल्याने कोणीही त्याला ओळखू शकत नाही.

आता अर्जुनच्या हाती साक्षीचं अर्ध पेडंट लागणार का? की त्याआधीच प्रिया त्याला ओळखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा आश्रम केससंदर्भातील महत्त्वाचा पुरावा असल्याने सगळेच या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या अडीच वर्षांपासून ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रेक्षकांना कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळत आहे. पण, कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आता या महिन्यात ( जुलै २०२५ ) या केसचा अंतिम निकाल लागणार आहे. आता या केसमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.