Tharala Tar Mag Marathi Serial : ‘ठरलं तर मग’ मालिकेत खूनाच्या रात्री वात्सल्य आश्रम परिसरात कोण -कोण उपस्थित होतं, त्यांचे कॉल डिटेल्स नेमके काय आहेत? याची संपूर्ण यादी अर्जुनला सापडलेली आहे. चैतन्यच्या मदतीने अर्जुनने हे कॉल डिटेल्स मिळवलेले असतात. पण, यामध्ये दोघांनाही एक भलताच फोन नंबर आढळतो.

वात्सल्य आश्रमात गेल्यावर साक्षीचा एक फोन बंद असतो आणि दुसरा फोन सुरू असतो. याचे कॉल डिटेल्स अर्जुनच्या हाती लागतात. अर्जुनला सापडलेल्या यादीत जो अनोळखी नंबर असतो तोच साक्षी शिखरेचा असतो. दुसरीकडे, दामिनीला सुद्धा अर्जुनकडे साक्षीचे कॉल डिटेल्स असल्याचा संशय येतो. त्यामुळे आता कोर्टाची माफी मागून, ‘मी आश्रमात उपस्थित होते’ हे कबूल करायचं असा सल्ला दामिनी साक्षीला देते. याशिवाय दिवसरात्र साक्षीकडून तेच वदवून घेत असते.

मात्र, साक्षीच्या मनात वेगळीच भीती असते. २ वर्षे आपण कोर्टात सांगतोय की मी आश्रमात नव्हते आणि आता अचानक चूक कबूल का करायची असे वेगवेगळे विचार साक्षीच्या डोक्यात सुरू होतात आणि ती एक मोठी चूक करते. कोर्टात प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाल्यावर दामिनीने सांगितल्याप्रमाणे साक्षी काहीच करत नाही.

यामुळेच अर्जुन त्याच्या स्टाइलने साक्षीला काही प्रश्न विचारतो आणि दरवेळीप्रमाणे ती तोंडावर पडते… या परिस्थितीत दामिनी सुद्धा काहीच करू शकत नसते. इतक्यात अर्जुन कोर्टाकडे तिच्या फोनवर फोन करण्याची परवानगी मागतो. दामिनी यासाठी ऑब्जेक्शन घेते पण, त्याचा फारसा फायदा होणार नाहीये.

अर्जुन भर कोर्टात साक्षीला खोटं सिद्ध करण्यासाठी तिच्या दुसऱ्या फोनवर फोन करतो. हा फोटो साक्षीच्या बॅगेत वाजतो आणि महिपतला मनात नसूनही लेकीचा फोन अर्जुनकडे सुपूर्द करावा लागतो. आपला दुसरा फोन अर्जुनच्या हाती लागलाय हा विचार करून साक्षीला धक्का बसतो. कारण, भर कोर्टात पुन्हा एकदा तिचा खोटेपणा सिद्ध झालेला आहे.

आता या सगळ्यावर दामिनीचा पुढचा प्लॅन काय असेल? कोर्टात झालेला गोंधळ पाहता दामिनी यापुढे साक्षी शिखरेला साथ देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अर्जुन कोर्टात म्हणतो, “त्या खूनाच्या रात्री आश्रमात विलास, मधुकर पाटील आणि तन्वी यांच्या व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती होती… तिच्या फोन नंबरचं लोकेशन आश्रमाजवळचं आहे. मिस साक्षी शिखरे तुमच्याकडे दुसरा फोन नंबर सुद्धा आहे. याचाच अर्थ खूनाच्या रात्री तुम्ही आश्रमाच्या आत होतात”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग २२ जुलै रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाईल.