Jui Gadkari Reveals What Bother Her Mother: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरी अनेकदा मालिकेमुळे चर्चेत असते. मालिकेतील तिच्या सायली या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळताना दिसते. तसेच, मालिकेत पुढे काय होणार, याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.
अभिनेत्री जुई गडकरीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. ती अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. आता मातृदिनाच्या निमित्ताने अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
काही फोटोंमध्ये ती तिच्या आईबरोबर तसेच आजीबरोबर दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे, या सगळ्या महिलांचा माझ्या आयुष्यावर मोठा प्रभवा आहे. मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकले आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे.
याबरोबरच, स्टार प्रवाह वाहिनीने मातृदिनानिमित्त मालिकांतील कलाकारांचे शुभेच्छा देणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये काही प्रश्नांची उत्तरे कलाकारांनी दिली आहेत. जुई गडकरीचादेखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
माझी आई सगळ्या बाबतीत खूप…
या व्हिडीओमध्ये तिला विचारण्यात आले की, आई लाडाने कोणत्या नावाने हाक मारते? त्यावर अभिनेत्री म्हणाली की, मिनू या नावाने हाक मारते. आईच्या हातचा सगळ्यात आवडता एक पदार्थ कोणता? यावर जुई म्हणाली की तसे सगळेच आवडतात, पण भेंडीची भाजी आणि फोडणीचं वरण हे माझ्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन आहे. स्वकमाईने घेतलेली पहिली गोष्ट कोणती? यावर जुई म्हणाली की आईसाठी एकटीसाठी असं नाही, पण आई-बाबांसाठी संपूर्ण टूर बूक केली होती.
कितीही मोठे झालात तरी आईला तुझ्यामधील खटकणारी गोष्ट कोणती? यावर जुई म्हणाली, “माझ्या आईला खरंच माझ्यातील कोणतीही गोष्ट खटकत नाही, कारण ती म्हणते की मी तिची कॉपी आहे आणि माझी आई सगळ्या बाबतीत खूप परफेक्ट आहे, त्यामुळे कदाचित मीसुद्धा परफेक्ट असेन.” तसेच तिने आईला देवाची उपमा दिली. याबरोबरच सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, जुई गडकरीचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा चाहत्यांची प्रश्नांची उत्तरे देताना दिसते. अभिनयाबरोबरच तिचे गाणेदेखील प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळते.