Jui Gadkari sang the song Saiyara: मराठी अभिनेत्री जुई गडकरी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाचा चाहतावर्ग मोठा आहे. अभिनेत्री सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. सायली या भूमिकेतून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते.
मालिकेबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर मालिकेबाबत ती अनेक गोष्टी शेअर करत असते. तसेच ती तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टीदेखील शेअर करत असते. याबरोबरच ती अनेकदा गाण्याचे काही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करते. अभिनयाबरोबरच तिच्या गाण्याचेदेखील मोठे कौतुक होते.
‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने गायलं ‘सैयारा’ गाणं
आता जुईने सोशल मीडियावर गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जुई गडकरीने सैयारा या बहुचर्चित चित्रपटातील सैयारा हे गाणे गायले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना जुईने लिहिले की चुका माफ करा. हे गाणं खूप आवडलं. याबरोबरच श्रेया घोषालला टॅग करत तिने लिहिले की, हे गाणे ज्या गायिकेने गायले तीदेखील माझी आवडती आहे. चित्रपटातील सर्व गाणी छान आहेत.
जुई गडकरीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “तुझा आवाज खूप छान आहे”, “जुई ताई मला तू गायलेली गाणी ऐकायला आवडतात”, “वाह! काय आवाज आहे”, “खूप छान”, “सुंदर”, “उत्कृष्ट गायन, अगदी मंत्रमुग्ध केलेस. तू अभिनय व गाण्यातील जो ताळमेळ ठेवतेस, तो कौतुकास्पद आहे”, “तुझ्या आवाजातील गोडव्यामुळे ऐकत राहावे वाटते”, “खूप सुंदर”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.




सैयारा हा चित्रपट १८ जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. चित्रपटाने तरुणाईची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील गाणी लोकप्रिय ठरली आहेत. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात अनित पड्डा व अहान पांडे मुख्य भूमिकेत आहेत.
दरम्यान, ठरलं तर मग ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अर्जुन-सायलीची केमिस्ट्री प्रेक्षकांची मने जिंकून घेते.