बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. यामधील प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. बॉबी देओलवर चित्रित झालेलं ‘जमाल कुडू’ गाणं आज घराघरांत लोकप्रिय झालंय. सामान्य लोकांपासून ते अगदी मोठमोठ्या सिनेस्टार्सपर्यंत सगळेजण ‘जमाल कुडू’ गाण्यावर थिरकले. अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत काही महिन्यांपूर्वी अर्जुन-सायली हनिमूनला गेल्याचा सीक्वेन्स दाखवण्यात आला होता. यावेळी मालिकेची नायिका सायली प्रियाने योजलेल्या प्लॅननुसार नशेत ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. हाच व्हिडीओ सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर ‘डान्स डे’चं औचित्य साधत पुन्हा शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने घेतलं नवीन घर, पुढच्या महिन्यात होणार पूजा; म्हणाली, “ही गोष्ट अजून…”

सायली या व्हिडीओमध्ये डोक्यावर शीतपेयाचा ग्लास ठेवून ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, मालिकेचा नायक अर्जुन तिला सावरत असल्याचं पाहायला मिळत आहे. जुईने हा व्हिडीओ शेअर करत “जणू कोणी पाहतच नाही असा डान्स तुम्ही करा” असं कॅप्शन देत जागतिक नृत्यदिनाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : खरा कोकणी माणूस! रेल्वे अन् एसटीतून प्रवास करत चिपळूणला पोहोचला प्रसिद्ध अभिनेता, नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जुई गडकरीच्या काही चाहत्यांनी तिचा हा भन्नाट डान्स पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. “तुम्ही उत्तम अभिनेत्री आहातच पण, याचबरोबर उत्तम डान्सर सुद्धा आहात” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या व्हिडीओवर केल्या आहेत.