Star Pravah Marathi Serial TRP : छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी नेहमीच चढाओढ सुरू असते. गेल्या अडीच वर्षांपासून ‘स्टार प्रवाह’ची ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या यादीत तसेच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सायली-अर्जुनचं प्रेम, सुभेदार कुटुंबीय, कोर्ट केस असं या मालिकेचं संपूर्ण कथानक चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.

आता लवकरच ‘ठरलं तर मग’ मालिकेत आश्रम केसचा अंतिम निकाल लागणार आहे. हा निकाल लागण्यासाठी आजपासून केवळ १८ दिवस उरले आहेत. त्यामुळे हा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, मधुभाऊंची निर्दोष सुटका होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कथानकातील हटके ट्विस्टमुळे गेल्या आठवड्यात ( २८ जून ते ४ जुलै ) सुद्धा ही मालिका ४.५ रेटिंगसह टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी होती.

‘ठरलं तर मग’ मालिकेनंतर दुसऱ्या स्थानी ईशा केसकरची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका आहे. यानंतर रेश्मा शिंदेच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेने टीआरपीच्या यादीत गेल्या आठवड्यात तिसरं स्थान मिळवलं आहे. तर, चौथ्या – पाचव्या स्थानी अनुक्रमे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकांचा क्रमांक लागतो आहे. मृणाल दुसानिसच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत सहावा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय अर्णव-ईश्वरीच्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेचा टीआरपी गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकांचा TRP

  • ठरलं तर मग
  • लक्ष्मीच्या पाऊलांनी
  • घरोघरी मातीच्या चुली
  • थोडं तुझं आणि थोडं माझं
  • कोण होतीस तू काय झालीस तू
  • लग्नानंतर होईलच प्रेम
  • तू ही रे माझा मितवा
  • येड लागलं प्रेमाचं
  • शिट्टी वाजली रे
  • साधी माणसं
trp
मराठी मालिकांचा टीआरपी

दरम्यान, आता येत्या काळात स्टार प्रवाहवर ‘लपंडाव’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. यामध्ये रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका देव यांच्या प्रमुख भूमिका असतील. आता या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.