‘ठरलं तर मग’ मालिका सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे. प्रताप सुभेदारांना कोर्टात निर्दोष सिद्ध करून महिपतला तुरुंगात धाडण्यात अर्जुन यशस्वी झाला आहे. सुभेदार कुटुंबीयांसमोर याचं संपूर्ण श्रेय तो बायकोला देतो. सायलीने खंबीरमध्ये अर्जुनला पाठिंबा दिल्यामुळे कल्पना देखील सुनेवर खूश असते. अशातच सुभेदारांच्या घरी रविराज किल्लेदारांचं आगमन होणार आहे.

अर्जुन-सायली महिपत विरोधातील सगळे पुरावे सर्वप्रथम रविराज किल्लेदारांसमोर सादर करून त्यांचा विश्वास संपादन करतात. यामुळे कोर्टात अर्जुनला प्रताप सुभेदारांची केस लढण्याची संधी मिळते. या सगळा घटनाक्रम अर्जुन-सायली सुभेदारांना समजावून सांगतात. पुढे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही आपल्या घरातल्यांची एवढी मदत केल्याने अर्जुन सायलीचे आभार मानतो.

हेही वाचा : Video : “गावची पालखी…”, कोकणात आहे रवी जाधव यांचं सुंदर घर, शेअर केला शिमगोत्सवाचा खास व्हिडीओ

अर्जुन-सायलीमध्ये हळुहळू मैत्रीपेक्षा जास्त प्रेमाचं नातं फुलत असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे. आता अर्जुन तिच्यासमोर प्रेमाची जाहीर कबुली केव्हा देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण असतानाच अचानक रविवार किल्लेदारांची एन्ट्री होते.

हेही वाचा : “आग लागली नाही, तर लावली”, ‘द साबरमती रिपोर्ट’चा थरारक टीझर प्रदर्शित, 12th Fail फेम विक्रांत मेस्सीने वेधलं लक्ष

अर्जुनवर नाराज असणारे त्याचे सिनिअर ( रविराज ) अचानक घरी आल्याने सगळे काळजी करू लागतात. परंतु, प्रत्यक्षात उलटंच घडतं. केससंदर्भात व्यवस्थित पुरावे गोळा करून वडिलांची सुटका केल्यामुळे ते अर्जुनचं कौतुक करतात. अर्जुन-रविराजमधल्या ज्युनिअर-सिनिअरच्या नात्याची पुन्हा एकदा दिलजमाई झालेली पाहून सायलीला प्रचंड आनंद होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविराजचा विश्वास संपादन केल्यामुळे अर्जुन एकीकडे आनंदी असतो परंतु, चैतन्यसारखा मित्र साक्षी शिखरेमुळे दुरावल्याचं दु:ख त्याच्या मनात असतं. आता भविष्यात चैतन्यसमोर साक्षीचा खोटा चेहरा उघड होणार का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन-सायलीमध्ये हळुहळू मैत्री फुलत असल्याने त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.