Marathi Serial TRP : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत नुकताच समर-स्वानंदीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडल्याचं पाहायला मिळालं. या लग्नसोहळ्याच्या सगळ्या विशेष भागांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या सात दिवसांच्या टीआरपीची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेला सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच आतापर्यंतचा सर्वाधिक टीआरपी मिळाला आहे. टीआरपीच्या शर्यतीत कोणत्या मालिकांनी बाजी मारलीये, थोडक्यात जाणून घेऊयात…
सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका नेहमीप्रमाणे टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. तर, अर्णव-ईश्वरीच्या मालिकेने दुसरं स्थान मिळवलं आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेची वेळ बदलल्यापासून सलग दोन्ही आठवडे ५ रेटिंगसह ही मालिका टीआरपीच्या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
टीआरपीच्या यादीतील तिसरी मालिका आहे ‘घरोघरी मातीच्या चुली’. सध्या या मालिकेत फ्लॅशबॅक एपिसोड्स सुरू आहेत. याद्वारे जानकी-हृषिकेशची लग्नाआधीची लव्हस्टोरी प्रेक्षकांना दाखवली जात आहे. हे वेगळं कथानक प्रेक्षकांना देखील आवडलं आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘नशीबवान’ या मालिका ४.१ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहेत. तर ‘झी मराठी’च्या ‘कमळी’ मालिकेने पहिल्यांदाच टीआरपीच्या शर्यतीत टॉप-५ मध्ये एन्ट्री घेतली हे. ‘कमळी’ मालिकेची दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकप्रियता पाहता येत्या दिवसांत ‘कमळी’ मालिका ९ वाजताची स्लॉट लीडर ठरू शकते असा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त केला गेला आहे.
मराठी मालिकांचा टीआरपी
- ठरलं तर मग – ५.६
- तू ही रे माझा मितवा – ५.०
- घरोघरी मातीच्या चुली – ४.६
- लग्नानंतर होईलच प्रेम व नशीबवान – ४.१
- कमळी – ३.९
- लक्ष्मीच्या पाऊलांनी – ३.७
- लक्ष्मी निवास व वीण दोघांतली ही तुटेना – ३.६
- येड लागलं प्रेमाचं – ३.३
- तारिणी – ३.२
- देवमाणूस – २.९
स्टार प्रवाहच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकांच्या टीआरपीमध्ये बरीच घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर ‘काजळमाया’ या नव्या मालिकाचा टीआरपी २.६ इतका आहे. याशिवाय ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या मालिकेची वेळ बदलल्यापासून ही मालिका टॉप-१५ च्या शर्यतीतून बाहेर झाली आहे.
