Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायली साक्षी शिखरेविरोधात पुरावे शोधत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही दिवसांत या लोकप्रिय मालिकेत अनेक ट्विस्ट आले आहेत. प्रियाने अश्विनशी लग्न केल्यामुळे सायली-अर्जुनच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, या दोघांना आता मधुभाऊंच्या केससंदर्भात घरात काहीच बोलता येत नाहीये. प्रिया चोरून ऐकून सगळी माहिती महिपतला पुरवत असते. त्यामुळे अर्जुन-सायली प्रत्येक गोष्टीबाबत चर्चा करताना अधिक सावधता बाळगत आहेत.

प्रियाने सगळ्या सुभेदारांना आपल्या जाळ्यात ओढून सायलीविरोधात त्यांचे कान भरले आहेत. यामुळे सायलीवर घरातल्या लोकांनी अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, सायली जराही चिडचिड न करता प्रियाला त्याच धीराने सामोरी जातेय. एकीकडे घर सांभाळून दुसरीकडे, ती अर्जुनला साक्षी शिखरेविरोधात पुरावे शोधण्यास देखील मदत करत आहे.

साक्षी विरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने लवकरच ही केस संपेल आणि मधुभाऊ निर्दोष सुटतील अशी अपेक्षा अर्जुनला असते. तो बायकोला म्हणतो, “साक्षीच्या विरोधात असे एक-एक पुरावे गोळा करून आपण ही केस सहज जिंकू शकतो.” पण, आता या दोघांच्या अडचणी वाढवण्यासाठी मालिकेत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

लेकीला जेलमधून सोडवण्यासाठी महिमत त्याच ताकदीच्या वकिलाला अर्जुनविरुद्ध लढा देण्यासाठी बोलावणार आहे. महिपत म्हणतो, “अर्जुनला या चक्रव्यूहात अडकवण्यासाठी मला त्याच ताकदीचा योद्धा लागणार…”

आता लवकरच प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती क्षिती जोग ‘ठरलं तर मग’ मालिकेत एन्ट्री घेणार आहे. क्षिती या मालिकेत अ‍ॅड. दामिनी देशमुख ही भूमिका साकारणार आहे. दामिनी हे पात्र कोर्टात अर्जुन सुभेदारला टफ फाइट देणार आहे. आता अर्जुन दामिनीवर मात करण्यात यशस्वी होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

View this post on Instagram

A post shared by tharal_tar_mag_ (@tharal_tar_mag_)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत क्षितीची एन्ट्री प्रेक्षकांच्या उद्याच्या ( २ एप्रिल ) भागात पाहायला मिळेल. आता अ‍ॅड. दामिनी देशमुखचा सायली-अर्जुनला कसा सामना करणार हे आपल्याला आगामी भागात पाहायला मिळेल.