Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या कोर्टरुम ड्रामा सुरू आहे. अर्जुनला प्रियाच्या वागणुकीवर पहिल्या दिवसापासून संशय असतो. त्यामुळेच तो मोठ्या हुशारीने तिला चौकशीकरता नोटीस पाठवतो. मात्र, प्रिया मानसिक स्थितीमुळे चौकशीसाठी येणार नाही असं उत्तर रविराज किल्लेदारांकडून दिलं जातं. हे सगळं झाल्यावर देखील अर्जुन शांत बसत नाही.

चैतन्यच्या मदतीने अर्जुन एक नवीन प्लॅन बनवतो. प्रियाची चौकशी मानसोपचार तज्ज्ञांसमोर केली जाईल, अशी नोटीस किल्लेदारांकडे पाठवली जाते. अर्जुनच्या या हुशारीसमोर रविराज किल्लेदार काहीच करू शकत नसतात. आता काही करून प्रियाला चौकशीसाठी उपस्थित राहावं लागणार असतं. अर्जुनमुळे प्रियाची पुरती कोंडी झालेली असते. या सगळ्यात प्रियाने दामिनीसमोर, “विलासची हत्या झाल्यानंतर मधुभाऊंच्या नावाने मेसेज मीच केला होता” अशी कुबली सुद्धा दिलेली असते. यामुळेच आता खोट्या तन्वीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होणार आहे.

दुसरीकडे सायली सुद्धा अर्जुनला या केसमध्ये जमेल तशी सगळी मदत करत असते. ती नवऱ्याला विचारते, “सायकोलॉजिस्टच्या उपस्थितीत जर प्रियाची चौकशी होतेय, तर या सगळ्याचा खरंच उपयोग होईल का?” कारण, प्रिया खूप हुशार असते याची सायलीला खात्री असते. पण, प्रिया नक्कीच काही ना काही चूक करणार याची अर्जुनला सुद्धा कल्पना असते.

अर्जुनच्या अपेक्षेप्रमाणे मानसोपचार तज्ज्ञांसमोर प्रिया भलतंच काहीतरी बोलते. ती चिडून म्हणते, “हजारदा सांगितलंय… भांडणाचा आवाज आला तेव्हा मी बाहेर आले आणि तेव्हा मला दिसलं की, मधुभाऊंनी डाव्या खिशातून बंदूक काढली आणि…” ती पुढे बोलत असतानाच अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो, “जस्ट अ सेकंड…गेल्यावेळी तू म्हणाली होतीस तसं तुझं स्पष्ट स्टेटमेंट आहे की…मधुभाऊंनी पिस्तूल कुठून काढलंय ते तुला आठवत सुद्धा नाहीये आणि आता डायरेक्ट म्हणतेस डावा खिसा…दॅट्स स्लॉव्ह मिस तन्वी खोटं बोलतेय.”

अर्जुनने मोठी चूक अचूक हेरल्यामुळे प्रियाचा चेहरा उतरतो. तर, सायलीला आनंद होतो. ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग येत्या ७ मे रोजी रात्री ८:१५ वाजता प्रसारित केला जाणार आहे.